*विना अनुदानीत शाळा कृती समितीचे ठीय्या आंदोलन*
*आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे निवेदन सोपविले*
*दारात ठिय्या आंदोलनात शिक्षक बसले*
*अहेरी:-* महाराष्ट्र राज्य विना अनुदानीत शाळा कृती समितीने बुधवार 17 जून रोजी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे निवेदन सोपवून आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या दारात ठीय्या आंदोलन सुरु केले.
कृती समितीचे प्रमुख मागण्या 13 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार वेतन अनुदानाचे आदेश कढावेत, 20% अनुदान घेत असलेल्या सर्व शाळाना शासन निर्णयाप्रमाणे 1 एप्रिल 2019 पासून पुढील वाढिस टप्पा द्यावा, अनुदानीत घोषित झालेल्या प्रार्थमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळाना शासन निर्णयाप्रमाणे 1 एप्रिल 2019 पासून 20 % अनुदान द्यावे, अघोषित असणाऱ्या सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा निधीसह घोषित करावे, 20% अनुदान घेत असलेल्या शाळांमधील शिक्षकांना सेवा संरक्षण द्यावे आदी मागण्या आहेत.
दिलेल्या निवेदनात गेली 15 ते 20 वर्षापासून बिनपगारी, प्रमानिकपने विद्यादानाचे पावित्र्य कार्य करीत असून गेली सहा महिन्यांपासून शासन केवळ आश्वासनेच दिली आहे शासनाकड़ून मोठी अपेक्षा होती, पन भ्रमनिरास खेरिज दूसरे काहीच मिळाले नसून नाइलाजास्तव ठिय्या आंदोलनाला बसावे लागत आहे असे महाराष्ट्र राज्य विना अनुदानीत शाळा कृती समितीने निवेदनात नमूद केले आहे.
*कोड:-*
मागील 15 ते 20 वर्षापासून अनुदान मिळेल या आशेवर आम्ही विद्याज्ञानाचे पवित्र काम करीत आहोत. 19 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार 1 एप्रिल 2019 पासून विनाअनुदानीत शाळांना पहिला टप्पा व 20% अनुदानीत शाळांना वाढीव टप्पा देय असून देखील वेतन वितरणाचे आदेश अद्यापही निर्गमित केलेले नाही. त्यामुळे विनाअनुदानीत शिक्षकांवर उपासमारीची पाळी आलेले आहे. जोपर्यंत शासन आम्हाला प्रत्यक्ष प्रचलित नियमानुसार अनुदान देणार नाही तोपर्यंत शासनाच्या विरोधात आंदोलन सुरूच राहणार. आतापर्यंत 161 आंदोलन झाले आहे…
श्रीकांत कोकुलवार
जिल्हाध्यक्ष
गडचिरोली जिल्हा का. विनाअनुदानीत शाळा कृती समिती