*बिग ब्रेकिंग*
*कर्तव्यावर असलेले सावनेर नगर परिषद चे मुख्याधिकारी रविंद्र भेलावे यांच्यावर भाजी विक्रेत्यांनी चढवला हल्ला*
*समाजसेवी व पत्रकार बांधवा मध्यस्था केल्याने टळला मोठा अप्रिय प्रसंग*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेर– कोरोना संसर्ग ला मात देने साठी सर्व अधिकारी व कर्मचारी दिवस रात्र मेहनत करित आहे.व पूर्ण सावनेर चे स्वछता ची पूर्णपणे काळजी येथील न.प. चे मुख्याधिकारी रविंद्र भेलावे घेत आहे.*
*आज सकाळी 10:30 च्या दरम्यान मुख्याधिकारी व न.प. कर्मचारी गडकरी चौक ते बाजार लाईन सावनेर मध्ये वाढलेल्या हातठेले व भाजी विक्रेता यांनी अतिक्रमण करुण रास्ता पुर्णता बंद केल्यादु्ष्य झाल्याने रहदारीच्या त्रास होत असल्याचे निदर्शनास येताच मुख्याधिकारी रविंद्र भेलावे आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊण घटनास्थळी गेले असता रस्त्यावरील गर्दी हटविण्याला सुरुवात केली असता अनेक दुकादारांच्या तोंडावर मास्ट नाही,दुकानात सेनिटाईझर नाही सोबतच दुकानाला दुकाने खेटून असून सोवत दहा वर्षा खालील मुल व 60-70 वर्षीय म्हातारे कोणत्याही सुरक्षा उपाययोजना न करता व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी दुकानदारांना जाब विचरला असता सर्व दुकानदार एकच चिडून मुख्याधिकारी यांना शिवीगाळ करुन त्यांचेशी वाद घालु लागले असता मुख्याधिकारी यांनी सक्ती करत सर्व दुकानदारांना दुकान हटविण्यासाठी सक्ती केल्याने दुकानदारांनी मुख्याधिकारी यांचेवर शिवीगाळ कयत एकच हल्ला चढवीला असता तनावाचे वातावरण निर्माण झाले*
*तर तिथे भाजी विक्रीतानी न.प. चे मुख्याधिकारी वर हल्ला केल्याची माहिती कळताच काही पत्रकार बांधव व समाजसेवी ने पुढाकार घेऊन तनाव कमी करण्याचा प्रयत्न करित पोलीसांना सदर घटनेची सुचना दिली असता पो.नी.अशोक कोळी यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेऊण स्थीतीवर नियंत्रन मिळवीले*
*सावनेर पोलीस स्टेशन चे निरीक्षक अशोक कोळी सदर प्रकरणाची तपासणी करुण दोषीवर कारवाई करण्यात येणार असुन कर्तव्यावर असलेल्या शासकीय अधिकारी यांचेवरच असे दुर्दैवी प्रसंग ओढावत असतील तर त्यांनी आपले कर्तव्य करावे कसे व ते कुणाकरिता या सर्व उपाययोजना करत आहेत हे ही महत्त्वाचे आहे कारण वाढत्या कोरोना संसर्गात ही ते आपले कर्तवक्षेत्र सुरक्षित ठेवण्यासाठी धावपळ करत आहे यावर असे कटू प्रसंग दुर्देवाची बाब आहे असे स्पष्ट मत व्यक्त केले.*
*मनन करणे योग्य*
*कर्मचारी ही मणूष्यच आहे व तो जेव्हा आपल्या कर्तव्यावर असतो तर काय त्याला त्याचे परिवार नाही.मागील तीन महिन्यापासुन सावनेर शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढु नये याकरिता स्थानिक नगर प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन रात्रंदिवस एक करत आहे व अश्यात कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी यांच्यावर झालेला भाजी विक्रेत्यांचा हा भ्याड हल्ला सावने शहराकरिता निंदनीय बाब असुन सदर घटनेचा सर्वंच स्तरावरून निषेध नोंदवील जात असून गडकरी चौक ते बाजर चौक येथील मुख्य*रस्त्याच्या भाजीपाला व फळ विक्रेत्यास रस्त्यावर दुकाने लाऊ न देण्याची मागणी जोर धरु लागली आहे.मुख्याधिकारी रविन्द्र भेलावे यांचेवर हल्ला चढविनार्यांवर कायदेशीर योग्य कारवाई व्हावी अशी मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे*