*मुख्याधिकारी यांचेवर हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करा* *महाराष्ट्र राज्य नगर परिषद/नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघनेची मागणी*

*मुख्याधिकारी यांचेवर हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करा*


*महाराष्ट्र राज्य नगर परिषद/नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघनेची मागणी*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले/प्रतिनिधी दिनेश चौरसीया*

*सावनेरः दि.20 जुन रोजी सकाळी 10-30 च्या दरम्यान आपल्या कर्तव्यावर असलेले मुख्याधिकारी रवींद्र भेलावे हे गडकरी चौकातील मुख्य रस्त्याच्या मधोमध लागलेल्या भाजी विक्रेत्यांना तेथून दुकाने हटवून वार्डामधे जाण्याच्या सुचना तसेच अधिकतर भाजी विक्रेत्यांनी मास्क लावले नसुन त्यांचे दुकानात सेनिटाईझर नसल्या संदर्भात विचारणा केली असता भाजी विक्रेत्यांनी त्यांच्याशी अभद्र भाषेचा वापर करत शिवीगाळ खरत जुवे मारण्याची धमकी देत.एकच जीवघेणा हल्ला चढविला असता काही पत्रकार बांधव व समाजसेवी यांनी मध्यस्था करत मुख्याधिकारी यांना भाजी विक्रेत्यांच्या तावडीतून सोडवत सदर घटनेची सुचना स्थानिक पोलीसांना दिली असता पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांनी घटनेचे गांभीर्य जाणून जमावास पांगवील्याची घटना घडली*

*नगर प्रशासनाचे मुख्याधिकारी यांचेवरच असे भ्याड़ प्राणघातक हल्ले होत असतील तर सामान्य कर्मचाऱ्यांनी दाद कुणाकडे मागावी अश्या निवेदन महाराष्ट्र राज्य नगर परिषद/नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष धिरज देशमुख यांचे नेतु्त्वात सचिव पंकज छेनीया,उपाध्यक्ष शेषराव वाढिकर संवर्ग अधिकारी दिनेश बुधे,सह अन्य पदाधिकारी कर्मचाऱ्यांच्या आदिंच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक अशोक कोळी मांना निवेदन सादर करुण मुख्याधिकारी यांचेवर भ्याड हल्ला करणार्यांना चोवीस तासात अटक करण्यात यावी अन्यथा योग्य न्याय मीळवीण्यासाठी नगर परिषद कर्मचारी संघटनेचे वतीने काम बंद आंदोलन करुन पुर्ण नागपूर जिल्ह्यातील नगर पालिका व नगर पंचायती बंद करण्यात येतील असे संघटनेच्या माध्यमातून दिलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली असुन सदर घटनेची माहीती मा.जिल्हाधिकारी नागपूर, मा.जिल्हा प्रशासन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर व उपविभागीय अधिकारी सावनेर यांना देण्यात आली असुन आज अचानक घडलेल्या या भ्याड हल्ल्यामुळे स्थानिक कर्मचारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे हे विशेष*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …