*नवीन सुमठाणा येथील अनधिकृत एअरटेल कंपनीच्या टॉवरचे बांधकाम बंद करा*
*नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे नागरीकांची मागणी*
वरोरा प्रतिनिधि- जुबेर शेख
वरोरा :दि.1जुलै. नवीन सुमठाणा येथील एका नागरिकाच्या खाजगी जागेवर एअरटेल कंपनीच्या मोबाईल टॉवर उभारणीचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र भविष्यात या टॉवरमुळे परिसरातील नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता असल्यामुळे नवीन सुमठाणा डोलारा प्रभाग क्र. ५ येथील नागरिकांनी विरोध प्रदर्शित करून भद्रावती नगर परिषदेचे नगराध्यक्ष तथा मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.भद्रावती तालुक्यातील नवीन सुमठाणा येथील देवगडे यांच्या खाजगी जागेवर एअरटेल कंपनीतर्फे मोबाईल टॉवर उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु सदर जागा ही दाट लोकवस्तीत असून या परिसरात मोठ्या प्रमाणात निवासी घरे आहेत. त्यामुळे भविष्यात सदर टॉवरच्या रेडिएशन (किरणोत्सर्ग) मुळे येथील नागरिकांना दमा, कॅन्सर व ईतर भयानक रोगांची लागण होण्याची दाट शक्यता आहे.तसेच सदर जागेची कोणत्याही प्रकारची अकृषक परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे एअरटेल कंपनीतर्फे उभारण्यात येणारा हा टॉवर दाट लोकवस्तीत न उभारता ईतर ठिकाणी हलविण्यात यावा, अशी मागणी नवीन सुमठाणा डोलारा प्रभाग क्र. ५ येथील नागरिकांकडून निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.भद्रावती नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देतांना नगरसेवक चंद्रकांत खारकर, सुरज गावंडे, शंकर मून, माजी नगरसेवक सिध्दार्थ बुरचुंडे, पनवेल शेंडे, प्रकाश चहांदे, सनमोहन सोनटक्के व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.