*भद्रावती पोलिसाची कारवाई.दारू तस्कराकडून ४ लाखाचा मुद्दे माल जप्त*

*भद्रावती पोलिसाची कारवाई.दारू तस्कराकडून ४ लाखाचा मुद्दे माल जप्त*


वरोरा प्रतिनिधि- जुबेर शेख
वरोरा1जुलै.तालुक्यातील चारगाव येथील वर्धा नदीच्या घाटावरून भद्रावती शहराकडे अवैधरिल्या दारूची वाहतूक करणाऱ्या तस्करांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना पाहून आपली दुचाकी वाहने व दारूच्या शिश्या असलेल्या पिशव्या घटनास्थळीच टाकून आरोपींना पळ काढला असून पोलिसांनी २ लाखाच्या दारूसह ४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची कारवाई दि.२९ जून रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान करण्यात आली.तीन युवक तीन दुचाकीवर देशी दारू भद्रावती शहराच्या दिशेने आणत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली.त्यानुसार पोलिसांनी सदर मार्गावर गस्त चालू ठेवली.दारू घेऊन येणाऱ्या युवकांना पोलीस दिसताच आपली दुचाकी वाहने व दारूच्या शिश्या असलेल्या पिशव्या घटनास्थळीच टाकून धूम ठोकली.त्यामुळे ते पोलिसांच्या हाती लागू शकले नाही. मात्र त्यांची तीन दुचाकी वाहने हाती लागली.त्यात बजाज पल्सर,हिरो इग्नेटर,होंडा अँक्टिवा या गाड्यांचा समावेश आहे.या तिन्ही गाडयांची किंमत २ लाख आहे. तर पिशव्यांमध्ये रॉकेट संत्रा देशी दारूच्या २१०० शिश्या आढळून आल्या असून त्या शिश्यांची किंमत २ लाख १० हजार रुपये आहे.अशा प्रकारे एकूण 4 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.ही कारवाई ठाणेदार सुनिलसिंग पवार यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठाकूर, अमोल तुळजेवार,पोलीस हवालदार विशाल बेझलवार,पोलीस शिपाई सचिन गुरनुले यांनी केली.या प्रकरणी आरोपी विरुद्ध भा.दं.वि.व दारूबंदी कायद्यान्वये भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार करीत आहेत.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …