*मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारण्याची धमकी*
प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे नरखेड तालुका व सोबत पवन कंळबे जलालखेडा
अंशकालीन स्त्री परिचर शुभांगी ढोणे चे पती विशाल ढोणे यांचा कारनामा.
प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन करतो शिवीगाळ.
मारण्याची देतो धमकी
ऍट्रॉसिटी च्या गुन्ह्यात अडकवण्याची देतो धमकी.
सर्व कर्मचाऱ्यांनी केली ग्रामपंचायतला लेखी तक्रार.
जलालखेडा पोलीस स्टेशन ला दिली तक्रार.
जलालखेडा (ता-१) येथून अगदी १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सर्व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, मारहाण करण्याची धमकी देणे व ऍट्रॉसिटी ऍक्ट मध्ये फसवण्याबाबत धमकी देणे असा प्रकार कित्येक दिवसापासून सुरु असून अखेर सर्व कर्मचाऱ्यांनी त्रासून अंशकालीन स्त्री परिचर शुभांगी विशाल ढोणे हिचे पती विशाल ढोणे यांच्या विरुद्ध मंगळवार (दि-३०) ला पोलीस स्टेशन जलालखेडा व ग्राम पंचायत मेंढला येथे तक्रार केली.
प्राथमिक आरोग्य केंद्र मेंढला येथे १५ महिन्यापासून अंशकालीन स्त्री परिचर म्हणून मेंढला गावातील शुभांगी विशाल ढोणे ही कार्यरत आहे. तिला प्राथमिक आरोग्य केंद्र मेंढला येथील कोणतेही शासकीय निवासस्थान उपलब्ध नाही. तरी तिचा पती विशाल ढोणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वसाहतीच्या परिसरात नेहमी येऊन शिविगाळ करतो. त्याला वसाहतीतील लोकांनी हटकले असता तो नेहमी मारण्याची धमकी देतो, व मी तलाठी कार्यालय मेंढला येथे कर्मचारी आहो, तुम्हाला सर्वांना मी या पी.एच.सी मधून हाकलून टाकील, तुम्ही जर माझी तक्रार कोणाला केली तर मी तुम्हाला ऍट्रोसिटी ऍक्ट मध्ये फसवून टाकीन अशी नेहमी धमकी देतो असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
मंगळवार (दि-३०) ला आरोग्य सेविका चेतना आगरकर (उपकेंद्र खापा) ह्या मासिक सभेकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र मेंढला येथे आल्या असता तिथे विशाल ढोणे आला व म्हणाला की माझ्या पत्नीला कोणीही काम सांगायचे नाही तिला काम सांगणारी तू कोण, मला विचारल्याशिवाय तू या दवाखान्यात कशी आली ? तू इथून निघून जा नाहीतर तुला ऍट्रोसिटी ऍक्ट मध्ये फसवून टाकीन, असे म्हणाला व शिविगाळ करू लागला व जीवे मारण्याची धमकी दिली. विशाल ढोणे हा नेहमी शिवीगाळ करतो व जीवे मारण्याची धमकी देतो. तसेच गेल्या एक ते दीड महिन्यापूर्वी १०८ रुग्णवाहिका वाहानचालकाला शस्त्र दाखवून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.माझ्या गावात १०८ ऍंबुलन्स ची काहीही गरज नाही असे म्हणत असतो. आता कोविड-१९ या साथ रोगाच्या काळामध्ये सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना २४ तास काम करावे लागत आहे . तरी पण मेंढला गावातील विशाल ढोणे हा शिवीगाळ करतो व जीवे मारण्याची धमकी देतो आणि ऍट्रोसिटी ऍक्ट मध्ये फसवून टाकण्याची धमकी देतो. यामुळे आम्हाला जबर मानसिक धक्का बसलेला आहे. यामुळे काही महिला वर्ग रात्रीला ड्युटी करतांना प्रचंड दहशतीखाली असतात, सगळा प्रकार वैद्यकीय अधिकारी डॉ. मिथुन घोलपे यांना सांगून सुद्धा त्यांनी कानाडोळा केला. विशाल ढोणे हा नेहमी प्रत्येक कर्मचाऱ्याला दबावामध्ये ठेवतो. जर हा संपूर्ण प्रकार थांबला नाही तर संपूर्ण कर्मचारी वर्ग ग्रामपंचायत कार्यालय मेंढला समोर आंदोलन करून कामबंद करतील असा इशारा तेथील सर्व कर्मचाऱ्यांनी दिला आहे. विशाल ढोणे विषयी जलालखेडा येथील पोलीस स्टेशन ला तक्रार केली असून या बाबतचे निवेदन ग्रामपंचायत ला दिले आहे. या व्यक्तीवर कार्यवाही होणे गरजेचे आहे. मेंढला येथील सरपंच वनिता चरपे याना या बाबतचे निवेदन देते वेळी या वेळी प्राथमिक आरोग्य मेंढला येथील आरोग्य सहायक सज्जन थुल, सुरेश सोनूले, आरोग्य सेविका चेतना आगरकर, खुशाली सावरकर, कल्पना अंबुलकर, जयश्री झाडे, अर्चना विधाते, प्रज्ञा शिरसाट, सविता आघाव, करुणा साहायिका हीवरकर, आरोग्य सेवक बाबा डब्रासे, मनोहर मडावी, राजरप्पू व वाहनचालक आशिष घोरसे उपस्थित होते.
फोटो ओळी :मेंढला येथील सरपंच वनिता चरपे याना निवेदन देताना मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचारी.
वैद्यकीय अधिकारी कसलीही कार्यवाही करत नसल्यामुळे वाढली हिम्मत.
— मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अंशकालीन स्त्री परिचर शुभांगी ढोणे हिचा पती विशाल ढोणे याचे शिवीगाळ करणे, मारण्याची धमकी देणे या गोष्टीचा त्रास सर्व कर्मचाऱ्यांना कित्येक महिन्यांपासून आहे. या बाबत त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. मिथुन घोलपे यांच्याकडे कित्येक दा तक्रार केली असून सुद्धा या वर कसलीही कार्यवाही डॉ. मिथुन घोलपे यांनी केली नाही. ते या गीष्टीकडे दुर्लक्ष करता असल्यामुळे या व्यक्तीची हिम्मत वाढली असल्यामुळे त्याचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. डॉ. मिथुन घोलपे नियमित दवाखान्यात नसतात त्या मुळे असले प्रकार होत असल्याचे बोलल्या जात आहे.
झालेल्या प्रकारा बाबतचे निवेदन प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सर्व कर्मचाऱ्यांनी दिले असून. या बाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल व दोषींवर ग्राम पंचायत मध्ये ठराव घेऊन कार्यवाही करण्यात येईल.
वनिता चरपे सरपंच ग्राम पंचायत मेंढला.
– माझ्या कडे लग्न असल्यामुळे मी दोन दिवस रजेवर होतो. झालेल्या प्रकारा बाबत मला माहिती नाही. मी दवाखान्या मध्ये गेल्यावर सर्वाना बोलावून नेमका प्रकार काय झाला आहे याची विचारणा करून योग्य ती कार्यवाही करतो.
डॉ. मिथुन घोलपे वैद्यकीय अधिकारी मेंढला.