*शेतकऱ्यांनी खते, कीटकनाशके वापरताना सावधानी बाळगावी*
*खंडविकास अधिकारी राठोड यांचे आव्हान*
उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे
मौदा : सध्या खरीप हंगाम सुरू आहे. शेतात पीक पेरणी करताना शेतकरी रासायनिक खते, कीटकनाशके याचा वापर करत असताना. शेतकऱ्यांनी सावधानी बाळगावी असे आव्हान मौदा पंचायत समिती चे खंडविकास अधिकारी दयाराम राठोड यांनी केले आहे.
खते, कीटकनाशके वापरत असताना हातमोजे, मास्क याचा वापर करावा. तसेच खते व कीटकनाशके हाताळल्यानंतर हात स्वच्छ साबणाने धुवावे. काम करत असताना तंबाखू, बीडी व खर्रा यापासून स्वतःला दूर ठेवावे. शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते वापरताना कृषी तज्ञ यांचा योग्य सल्ला घेऊनच खते बियाणे चा वापर करावा. असे आवाहन राठोड यांनी केले आहे.