*सोबत दारू ढोसणे एकाच्या जीवावर बेतले*
*दोन आरोपी गजाआड*
नरखेड तालुका प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे
नरखेड- पोलीस ठाण्याअंतर्गत मोवाड येथे काल रात्रीला तीन मित्र एकत्र रामा बनाईत याच्या घरी दारू ढोसत बसले असता, क्षुल्लक कारणावरून तिघांमध्ये भांडण झाले व मारामारी झाली. त्या दोघांनी एकाला विटा, फावडे व बांबूने चांगलेच बदडले. त्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत सविस्तर व्रुत्त असे की, काल रात्री रामा बनाईत (४५) रा.मोवाड, गजेंद्र बडघरे (५२) व उमेश जैन (२८) दोघेही रा.मोवाड हे तिघेही रामा बनाईत याचे राहते घरी दारू ढोसत होते. काही क्षुल्लक कारणावरून तिघांमध्ये बाचाबाची झाली. त्यात गजेंद्र व उमेश याचा राग अनावरन झाला. रागाचे भरात गजेंद्र व उमेश यांनी रामा बनाईत याला विटा, फावडे व बांबूने चांगलेच बदडले. रक्तबंबाळ होऊन रामा बनाईतचा जागीच मृत्यू झाला. सोबत दारू ढोसणेे रामा बनाईत च्या जीवावर बेतले.
आरोपी गजेंद्र बडघरे व उमेश जैन यांनी आठवडी बाजारातून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच मोवाड पोलिस चौकीचे शैलेश डोंगरदिवे व निलेश खरडे यांनी सतर्कतेने आरोपींना पकडले. झालेल्या खुनाची माहिती नरखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार मल्लिकार्जुन इंगळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करण्याअगोदरच खुनाच्या गुन्ह्यात आरोपींना गजाआड केले. या प्रकरणी नरखेड पोलिसांनी दोन्ही आरोपीना भा.द.वी.च्या कलम ३०२,३४अन्वये खुणाच्या गुन्हेची नोंद केली असून पुढील तपास नरखेड पोलीस करीत आहे.मात्र
सदर खुणाबाबत माहिती घेण्याकरिता गेलेल्या दोन पत्रकारांनाच ठाणेदार इंगळे यांनी माहिती न देताच उठून जा व एका तासाने माहितीसाठी या असे फर्माविले.परंतु वेळेवर पत्रकारानाच ठाणेदार इंगळे यांचे कडुन अशी बतावणी म्हणजे पत्रकारानी काय समजावे असा सवाल तालुका पत्रकार संघाच्या पत्रकार वर्तुळात उठत आहे.
मृतकाची पत्नीसुध्दा दहा वर्षाआधी जळुन मरण पावली. त्याला एक १५ वर्षाची मुलगी व ११ वर्षाचा मुलगा असुन हे दोंन्ही लेकरं आई वडीलाविना पोरकी झाली असुन यांच्या उदरभरणाचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे हे विशेष.