*अभ्यास सुरू राजनगट्टा या लहानशा गावात अनोखा उपक्रम*
*जिल्हा संघटक अनुप कोहळे यानी घेतला मोठा पुढाकार*
कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे
कोरपना :- अख्या जगत Covid-19 मुळे लॉकडाऊन काळात सर्वत्र शाळा महाविद्यालये बंद पडली असतांना, याचा सर्वात जास्ती वाईट प्रभाव खेड्यातील मुलांवर पडला आहे.अशिक्षित आई वडील किंवा मजुरी करणारे पालक आपल्या नियमीत कामांमुळे आपल्या पाल्याला पुरेशा वेळ देऊन त्याचा अभ्यास घेऊ शकत नाही, त्यामुळे खेड्यातील विद्यार्थ्यांचा मोठा नुकसान होत आहे व त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर पडत असून त्यांच्या अभ्यासाची लिंक तुटू नये म्हणून मायावृक्ष प्रतिष्ठान चे कार्यक्रम प्रमुख तथा वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद चे जिल्हा संघटक अनुप कोहळे यांनी राजनगट्टा या लहानश्या गावात सामजिक अंतर ठेवत व कोरोना संदर्भात घ्यायच्या सर्व दक्षतांचे पालन करत अभ्यास सुरू या उपक्रमाची सुरुवात केली आहे,या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांमधील कला गुण विकसीत करून त्यांना अभ्यासाशी जुळूवून ठेवण्यासाठी पुस्तक वाचन, लेखन, भाषण, संभाषण, नृत्य, खेळ, इत्यादी गोष्टी शिकविल्या जातात.सदर उपक्रम मायावृक्ष प्रतिष्ठान व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद गडचिरोली यांच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे.
आपन सुरक्षित रहा. व दुसऱ्याना सुरक्षित ठेवा