*सासरच्या जाचाला कंटाळून विवाहीतेची मातीचे तेल घेऊन आत्महत्या*
*सावनेर पो.स्टे हद्दीतील वाघोडा बजाज काॅलनीतील घटना*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*आत्महत्येस प्रवृत्त करणा-या कुटूंबाविरूद्ध गुन्हा दाखल*
*सावनेर : हुंडयासाठी चारित्र्यावर संषय घेऊन नववधुला आत्महत्येस प्रवृत्त करणा-या पतीसह कुटूंबाविरूद्ध सावनेर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.अष्वीनी दिनेश सोलंकी (22) रा. क्वार्टर नं 13/05 बजाज काॅलनी वेकीली वाघोडा सावनेर असे आत्महत्या करणा-या नववधुचे नांव असून 1) दिनेष रमेष सालंकी, 2) सौ उर्मिला रमेष सोलंकी व 3) रमेष होनीलाल सोलंकी, सर्व रा. क्वार्टर नं 13/05 बजाज काॅलनी वेकीली वाघोडा सावनेर असे आरोपिंचे नांव आहे.*
*प्राप्त माहिती नुसार बजाज काॅलनी क्वार्टर क्र. 13/05, डब्ल्यु.सी.एल. वाघोडा येथे रहात असलेल्या आरोपी दिनेष रमेष सोलंकी याचे रामकिषन घुडीया मानकर, वय 54 वर्ष, रा. पालखेड, ता. मोहखेड, जि. छिंदवाडा (म.प्र.) यांची मुलगी मृतक सौ. अष्विनी दिनेष सोलंकी, वय 22 वर्ष हिच्या सोबत दि. 23/05/2019 रोजी लग्न झाले होते.*
*लग्न झाल्यापासून 1) दिनेश रमेश सोलंकी, 2) सौ उर्मिला रमेश सोलंकी व 3) रमेश होनीलाल सोलंकी, यांनी संगनमत करून तिच्या चारित्र्यावर संशय घेवून तसेच तिला माहेरून मोटरसायकल व 3 तोळे सोण्याची मागणी केली. मागणी पुर्ण न झाल्याने तिला शारीरिक व मानसिक त्रास देवुन सतत तिचा छळ केला. सदर त्रासाला कंटाळुन तिने दिनांक 21/05/2020 रोजी 08.00 वा. दरम्यान स्वतःच्या अंगावर राॅकेल टाकुण जाळुन घेतले.*
*दिनांक 24 जून 2020 रोजी संध्याकाळी 06.15 वा. दरम्यान शासकीय वैधकीय महाविद्यालय नागपुर येथे तिचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. फिर्यादी रामकिशन घुडीया मानकर,चे तक्रारी वरून सदर गुन्हा नोंद करण्यात आला असून तीला जळुन मरण्यास आरोपी हे कारणीभुत ठरले आहे.*
*प्राप्त कागदपत्रावरून मर्ग क्र. 33/20 कलम 174 जाफौ वरून व सदर प्रकरणी फिर्यादीचे रिपोर्ट वरुन व मर्गच्या तपासात वरील नमुद आरोपी कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाल्यावरून पो.स्टे. सावनेर येथे आरोपी विरुध्द कलम 304 (ब), 306, 34 भादंवी. सहकलम 4 हुंडा प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पो.नी आशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे*