*लोहारी सावंगा परिसरात लांडगा,कोल्हा व बिबट्या चा धुमाकूळ*
लोहारी सावंगा प्रतिनिधी- अनिल बालपांडे
लोहारी सावंगा – आजूबाजूच्या परिसरात जंगली जना वरांनी धुमाकूळ घातला असून गाय,बैलं तसेच पाळीव जनावरांना भक्षक केले जात आहेत त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, शेतीचे कामे सुरू झाली त्यामुळे शेतकरी हा आपली जनावरें शेतातील गोठ्यात बांधतात, व रात्रीच्या अंधारात बिबट कोल्हा लांडगा ही जंगली प्राणी हल्ला चढवतात त्यामुळे ऐन हंगामात शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे
मागील महिन्यात लोहारी सावंगा येथे पिसाळलेल्या लांडग्यांने 3 इसमान्ना जखमी केलें होते त्यापैकी एका युवकला आपला जीव गमवावा लागला
खबरदारी चा उपाय म्हणून वनविभागाने लोहारी सावंगा व आसपासच्या परिसरात दवंडी द्रा रे सूचना देण्यात आली की कोणीही शेतकरी रात्री ला आपली जनावरें शेतात ठेवून ये तसेच आपण सुद्धा रात्री ला शेतात राहू नये,परंतू या दवंडी ने काही होणार नाही यावर वनविभाग महाराष्ट्र शासनाने काही तरी उपाय योजना करावी असे परिसरातील शेतकरी, शेतमजुरांची आर्त हाक आहे