*वीज बिलाच्या भडक्याने जनता त्रस्त*
*विज बिल घेण्यास नकार*
*ऊर्जामंत्र्यानी शब्द पाळावा*
उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे*
मौदा : लॉक डाऊन च्या काळात मागील तीन महिन्यापासून राज्यातील वीज ग्राहकांना विजेचे बिल देण्यात आले नव्हते. मात्र आता एकाच वेळी भरमसाठ बिल आल्याने मौदा तालुक्यासह ग्रामीण भागात नागरिक त्रस्त झाले आहेत. कोरोनाच्या धोक्यामुळे अनेक जणांनी आपापल्या गावी धाव घेवून घरीच राहणे पसंत केले. हातचे कामधंदे बंद झाल्यामुळे अनेकांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे खिशात एकही दमडी नसताना वीज बिलाचा भरणा करावा कसा असा प्रश्न उभा ठाकला आहे.
काम बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे उत्पन्नाचे साधन हिरावले गेले. त्यातच आता लाँकडाऊन मध्ये अवाढव्य वीज कंपनीने पाठवलेल्या बिलामुळे ग्राहकांची पंचाईत झाली आहे. सर्वसामान्य नोकरदार, रोजंदारी काम करणारे मजूर सर्वांना आर्थिक चणचण जाणवत असताना अशाप्रकारे भरमसाठ बिल आल्याने हे बिल भरावे कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे एकीकडे उत्पन्नाचे साधन हिरावले गेले असे असताना अशा प्रकारे आर्थिक पिळवणूक होत असताना वीज ग्राहकांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.
मौदा तालुक्यातील सावंगी गावातील दि. ३ जुलै रोजी गावकऱ्यांनी विजेचे बिल घेण्यासाठी विरोध केला. यावेळी मौदा तालुका माजी महामंत्री श्विष्णु देशमुख, अर्जुन बावनकुळे, नितेश कुभंरे, राजकुमार जुगनायके, भिमराव बावनकुळे, राजु धुर्वे, भगवान परतेती, शंकर कुभंरे, आनंद मडावी, प्रमोद कुभंरे, संजय गेडाम, मालुबाई मरस्कोल्ले, सुशिला कुंभरे आदींनी विज वितरण कंपनी चे बील घेऊन आलेल्या कर्मचार्यास बील न घेता आल्या पावली परत पाठवून निषेध व्यक्त करण्यात आला. व आम्ही तीन महिन्याचे बील भरणार नाही असे ठणकावून सांगितले. ऊर्जामंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा व तीन महिन्याचे विज बिल माफ करावे अशी मागणी करण्यात आली. यात सावंगी, कोदामेंढी, वाघबोडी, अडेगाव, बोरी यासारखे अनेक गावांचा समावेश आहे.