*बिग ब्रेकिंग न्यूज* *रामटेक_शहरात_तीन_कोरोना_रुग्ण_आढळल्याने_शहरात_वाढले_हडकंप*

*बिग ब्रेकिंग न्यूज*

*रामटेक_शहरात_तीन_कोरोना_रुग्ण_आढळल्याने_शहरात_वाढले_हडकंप*

रामटेक प्रतिनिधी :- पंकज चौधरी

रामटेकनागपूर जिल्ह्यासह देशात सर्वत्र कोरोना चे 5 लक्ष पेक्षा जास्त रुग्ण आढळूण आले असले तरी आठवड्या भऱ्यापूर्वी रामटेक तालुक्यात एकही रुग्ण नव्हता, परंतु याच आठवड्यात रामटेक तालुक्यातील नगरधन आणि हिवरा बाजार येथे प्रत्येकी एक- एक रुग्ण आढळले. त्याच मागोमाग रामटेक शहरात देखील आज तीन रुग्णांचे अहवाल पोझिटीव्ह आले असल्याने रामटेक शहरासह तालुक्यात खडबड वाढली आहे. रामटेक शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने रोज अनेकांची धावपळ या शहराकडे असते यामुळे शहरात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
आज मिळालेल्या तीन रुग्णाच्या अहवालाने प्रशासन खडबडून जागे झाले असून आज सकाळी पासूनच महात्मा गांधी वार्ड येथील भंडारा जिल्ह्यातून गावावरून कर्तव्यावर परतलेल्या 45 वर्षाच्या व्यक्तीला, तसेच नेहरू वॉर्ड येथील स्थानिक युवक आणि टिळक वॉर्ड येथील एक युवती जी बाहेर गावावरून परतले असता रामटेक ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात त्यांची स्वाब टेस्ट केले असता तीनही रुग्ण पोझिटिव्ह आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दोन पुरुष आणि एक महिला असे तीन रुग्ण असून तीनही रुग्णांना आज सकाळी पासून त्यांची कोरोना पोझिटीव्ह रिपोर्ट येई पर्यंतची एतीहासिक माहिती घेण्यात येत असून रुग्णांना संस्थात्मक विलगिकरणा साठी नेण्याची प्रक्रिया सुरू आहे. उपविभागीय अधिकारी रामटेक, आरोग्य अधिकारी व रामटेक पोलीस प्रशासन पुढील कार्यवाही करीत असून हे तीनही रुग्ण आणखी किती नागरिकांच्या संपर्कात आले याचा तपास करीत आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …