*राजगृहाची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकावर कठोर शिक्षा करा* *ग्रामपंचायत सदस्य रोशन मेश्राम यांचे गृहमंत्र्यांना निवेदन*

*राजगृहाची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकावर कठोर शिक्षा करा*

*ग्रामपंचायत सदस्य रोशन मेश्राम यांचे गृहमंत्र्यांना निवेदन*

उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे

मौदा : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईमधील दादर स्थित निवासस्थान असलेले ‘राजगृहाची’ दि.७ जुलै रोजी सायंकाळी दोन अज्ञात समाजकंटकांनी कडून तोडफोड करण्यात आली. या पवित्र वास्तुची ही अशी तोडफोड होणे हे अतिशय संतापजनक बाब आहे. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच राजगृह घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झालेले आहे.

‘राजगृह’ ही आमची अस्मिता आहे, बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. आम्हा आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. माथेफिरूंनी केलेली ही तोडफोड हा आमच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला आहे. असे मत ग्रामपंचायत सदस्य रोशन मेश्राम व अनुसुचित जाती विभागाचे जिल्हा समन्वयक अशोक पाटील यांनी व्यक्त करून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. दादर स्थित राजगृहा वर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटक माथेफिरुंचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक शिक्षा करावी अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना तहसीलदार मौदा प्रशांत सांगडे यांचेमार्फत देण्यात आले.

निवेदन सादरकर्ते रोशन मेश्राम, अशोक पाटील, अशोककुमार डडुरे, मनोज कडू, राजेश गेडाम, राकेश वाघमारे, किशोर मेश्राम, सौरभ चोपकर, मनोहर भिवगडे उपस्थित होते.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …