*रामटेक तालुक्यातील बोरडा सराखा येथील 22 वर्षीय तरुणी निघाली कोरोना पोजीटीव्ह…*
रामटेक तालुका प्रतिनिधी:- पंकज चौधरी
रामटेक :- मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी स्वतःच्या डिलिव्हरी करिता आपल्या माहेरी म्हणजेच बोरडा सराखा येथे दि.29/2/2020 ला आली होती.नंतर पूर्ण लॉकडाऊन मध्ये ती आपल्या वडिलांच्या घरीच होती.दि.5/7/2020 ला तिच्या पोटात दुखत असल्यामुळे तिला मनसर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.तिथेच तिची डीलिव्हरी झाली..त्यानंतर तिच्या बाळाचे वजन कमी असल्यामुळे तिला रामटेक येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले.तिथून सुद्धा तिला नागपूर येथील डागा हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले.तिला डागा हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिची कोरोनाची लागण झाली… काल सायंकाळी दि.11/7/2020 ला तिचा अहवाल हा पोजीटीव्ह दिसून आला..ही माहिती मनसर रुग्णालयात कळताच तेथील सर्व टीम मुलीच्या आईच्या गावी आली.आणि घराजवडील व्यक्तींची चाचणी घेऊ लागले.मुलीसोबत तिची आई आणि नवरा असल्याची माहिती मिळाली आहे.कुणीही नागपूर वरून गावात आलेले नाही,आणि गावातून देखील दवाखान्यात बघायला कुणी गेले नाहीत हे सांगितले जात आहेत.सद्या मुलीच्या वडिलांच्या घराजवडील भाग सील करण्यात आले आहे.व घराजवडील लोकांना होम क्वारनटाईन केले आहे…