*कोरोना विवाह संकट : ग्रामीण भागात ही केला शिरकाव*
*ग्रामीण भागात ही केला शिरकाव – खरांगणा, झाडगाव येथील मैत्रीणी निघाल्या बाधित, लग्नातून सात जण बाधित, आर्वी येथील व्यक्ती ही पॉजीटिव*
वर्धा प्रतिनिधि-विश्वास बांगरे
वर्धा : पिपरी (मेघे) येथील विवाहाने जिल्ह्याचे संकट वाढविले आहे.शनिवारी नवरीच्या दोन मैत्रीणी पॉजीटिव निघाल्या. त्या ग्रामीण भागातील असल्याने आता कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आर्वी येथील नेताजी वार्डातील एक 42 वर्षिय व्यक्तीसुद्धा बाधित निघाला आहे.तो उपचारासाठी सावंगी येथील रूग्णालयात आला होता.सर्वात प्रथम नवरदेव पॉजीटिव निघाला होता.त्यानंतर नवरी, मुलाची आई व मामे भाऊ व बहिण पॉजीटिव निघाली होती. आर्वी तालुक्यातील झाडगांव येथील 22 वर्षिय व नटाळा बोथली येथील मैत्रीणीचा रिपोर्ट पॉजीटिव आला आहे. प्रशासनाने दोन्ही गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहे. प्रशासनाने आर्वीतील नेताजी वार्डातही उपाययोजना सुरू केल्या. कोरोनाबाधितांच्या अतिजवळच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे