*विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीने मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री चे पुतळे जाळले*
प्रतिनिधि-विश्वास बांगरे
वर्धा– आज दि.१३/०७/२०२० ला आंजी (मोठी) येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीने मुख्यमंत्री व उर्जामंत्र्यांचे पुतळे जाळुन कोरोनाकाळातील विदर्भातील जनतेला पाठवलेल्या वाढीव विज बिलांचा निषेध केला व विदर्भातील जनतेला आलेले कोरोनाकाळातील विजबिलं भरणार नाही याचा पुनरुच्चार केला.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या आव्हाहनानुसार विदर्भातील शेतकरी व जनतेना सम्पुर्ण विज मुक्त करण्याची घोषणा सरकार करणार नाही तोपर्यंत विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी वर्धा जिल्हा विदर्भद्रोही मुख्यमंत्री व उर्जामंत्र्यांचे पुतळे जाळण्याचा कार्यक्रम जिल्हाभर करत राहील याकाळातील विजबिल जनतेने भरु नये असे आवाहन केले व कुणीही तोडण्याचा प्रयत्न केला तर विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी वर्धा जिल्हा हा प्रयत्न हाणुन पाडणार असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन डाफे यांनी सांगितले.
या आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी वर्धा तालुका अध्यक्ष मुकेश ठाकुर, शेतकरी संघटना युवा आघाडी वर्धा तालुका अध्यक्ष विशाल फाळके, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते महादेवराव गोहो,दिलीप खडतकर,उत्तम सयाम,नागोसे, गजानन कडु, किशोर रुईकर, संतोष हाडके,शाम बोंदरे, केशवराव फाळके,उमेश खैरै, भोसले खैरी,प्रमोद हिवरकर व गावातील महीला व नागरीक सहभागी होते.