*आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे कोरोना वर मात करुन अालेला व्यक्तीचा मृत्य*
* मृतकाच्या भावाने अारोग्य विभागावर केला अारोप*
* क्वारन्टाईन सेंटल मध्ये सोई सुविधांचा अभाव
मृतकाची स्वॅब टेस्ट न करता दफन करण्यात अाले*
रामटेक तालूका प्रतिनिधी- ललित कनोजे
रामटेक– तालूका मधिल हिवरा बाजार या गावामध्ये मुंबई वरुन ४६ वर्षीय युवक त्यांचा मिञासोबत २९ जून रोजी अाला होता .त्यांचे स्वॅब रामटेक सितलवाडी येथे घेण्यात अाले होते. व त्यामध्ये तो पाॅजिटीव्ह निघाला उपचार करीता ३० जून ला त्याला नागपूर येथिल इंदिरा गांधी मेडीकल काॅलेज ( मेयो ) येथे भरती करण्यात अाले होते व त्याने कोरोना वर मात करुन दि. ९ जुलै ला डिस्चार्ज करण्यात अाले व त्यांला रुग्णवाहीने ने हिवरा बाजार येथे अाणून सोडले व त्याला हिवरा बाजार येथे जि. प. प्राथमिक शाळेत ठेवण्यात अाले . परंतु अाज अचानक अापल्या रुम मध्ये तो मृत अवस्थेत अाढळून अाला .अाज सकाळी तो अावाज दिल्या वर उठला नाही त्यामुळे अाजुबाजुच्या खोलीत क्वारन्टाईन असलेल्या लोकांनी त्यांला अावाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला असता त्यांने प्रतिसाद दिला नाही . तेव्हा त्यांनी बाहेर डयुटीवर असलेले कर्मचारी यांना सुचना दिली तसेच ग्रामपंचायतीला कळविले . तेव्हा मागून खिडकी तोडून डोकाऊन पाहीले असता तो मृत अवस्थेत अाढळून त्यांची कोणत्याही प्रकारची हालचाल करीत नसल्याने दिसले . आरोग्य विभागाला याची सुचना सकाळी अाठ वाजता देण्यात अाली .अारोग्य विभागातील काही कर्मचार्यांनी येऊन त्यांची कोणत्याही प्रकारची हालचाल करीत नसल्याचे दिसले अारोग्य विभागातील काही कर्मचार्यांनी येऊन त्याची तपासणी केली व मृत घोषीत केले. नतंर साडेअकराच्या दरम्यान डाॅ. गुप्ता वैद्यकिय अधिकारी प्राथमिक अारोग्य केंद्र उपस्थित झाल्याव तो तरुण हदय विकारांच्या तिव्र झटक्याने तो मरण पावल्याचे घोषित केले . तसेच तो उपचारार्थ मेयो मध्ये असतांना त्याला ३० जून ला राञी हदयविकाराचा झटका अाला होता असेही सांगीतले . मृतकांच्या भावाला विचारले असता अाम्हाल हदयविकाराच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची सुचना दिलेली नव्हती अारोग्य विभागातील लोकांनी माहीती लपविली व अाम्हाला अंधारात ठेवले त्यांचा कोणत्याच प्रकारचा उपचारन करता त्यांला हिवरा बाजार येथे अाणून सोडून दिले व इथे हिवरा बाजार येथे सुध्दा त्याची कोणत्याच प्रकारची आरोग्य तपासणी केलेली नाही माझ्या भावाचा मृत्यु अारोग्य विभागाच्या हलगर्जीमुळे झालेला अाहे . याची चौकशी करण्यात यानी अहे सांगीतले .
तो कोरोना पाजिटीव्ह असतांना सुध्दा त्याला हदयविकाराची झटका अाल्यानंतर ही त्याला नऊ दिवसांत मेयो रुग्णालयातूनकशी ? सुट्टी देण्यात अाली . ही अत्यंत गंभीर बाब अाहे . त्याच प्रमाणे अाज त्यांची कोणत्याच प्रकारची कोरोना विषयी तपासणी न करता हिवरा बाजार येथिल दफन भुमीमध्ये दफन करण्यात अाले .
त्याला नागपूर येथे मेयो रुग्णालयात उपचार सुरु असतांना ह्रदयविकाराचा झटका अाला होता . उपचारानंतर तो बरा झाला होता . त्याचा मृत्यू ह्रदयविकाराने झाला अाहे .
– *प्राजक्ता गुप्ता*
वैद्यकीय अधिकारी प्राथमिक अारोग्य केंद्र , हिवरा बाजार