– निधन वार्ता –
*राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांना पितृशोक*
*राजे विजयकुमार गुजर यांचे निधन*
उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे
मौदा : नागपूर जिल्हा (ग्रामीण) राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांचे वडील राजे विजयकुमार यशवंतराव गुजर यांचे आज दि. १४ जुलै रोजी वृद्धपकाळाने त्यांचा ‘गुजरवाडा’ या निवासस्थानी निधन झाले.
ते ८७ वर्षाचे होते. दि.१५ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता अंतिम संस्कार मौदा येथील स्मशान भूमीवर करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.