*दोन पोलिस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात* *खापरखेडा पोलिस ठाण्यातीलच घटना*

*दोन पोलिस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात*


*खापरखेडा पोलिस ठाण्यातीलच घटना*

खापरखेडा प्रतिनिधि

खापरखेडापोलीस स्टेशन हद्दीतून रेतीची वाहतूक होण्यासाठी एन्ट्रीची रक्कम मागण्याच्या गुन्ह्यात नागपूर एसीबी च्या टीम ने खापरखेडा पोलीस स्टेशनचे 2 कर्मचारी यांना 5000 रुपये लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाही मंगळवारी दुपारी 3 वाजता सुमारास झाली. तक्रारकर्ता अमित सरोदे राहणार कोराडी यांची कोराडी येथे मटेरियल सप्लायरचे काम आहे. 5 जून ला सायंकाळी अमित सरोदे यांचा रेतीने भरलेला ट्रक अवैध रित्या वाहतूक होत असताना खापरखेडा पोलीस स्टेशनचे उमेश ठाकरे आणि सुरेंद्र ठाकरे यांनी दहेगाव येथे पकडून खापरखेडा पोलीस स्टेशन येथे जमा केला होता. यावेळी अवैध रेती वाहतुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यावेळी प्रकरण सेटलमेंट करण्यासाठी फिर्यादी याने 60 हजार रुपये दिल्याने तो या पोलीस कर्मचारी वर चिडून होता. ट्रकने रेतीची वाहतूक करता यावी यासाठी अमित ने सुरेंद्र ठाकरे या खापरखेडा येथील पोलीस कर्मचारी यांच्याशी संपर्क साधला. सुरेंद्र ठाकरे हे खापरखेडा पोलीस स्टेशन येथे डी बी पथक मध्ये कार्यरत आहे. सुरेंद्र यांनी रेतीच्या वाहतुकी साठी एन्ट्री दरमहा एक गाडीसाठी 5000 रुपये सांगितले. तक्रारदार अमित याने नागपूर एसीबी कार्यालय येथे संपर्क साधून सुरेंद्र ठाकरे रेतीच्या ट्रक ची वाहतूक साठी 5000 रुपये लाच मागत असल्याची तक्रार दिली. पोलीस निरीक्षक योगिता चाफले यांच्या नेतृत्वात सुरेंद्र ठाकरे यांना रंगेहाथ पकडण्यासाठी सोमवारी खापरखेडा पोलीस स्टेशन च्या बाहेर ट्रॅप लावण्यात आला मात्र यात यश न आल्याने मंगळवारी पुन्हा ट्रॅप लावण्यात आला. यावेळी 5000 हजार रुपये रक्कमेची लाचेची देवाण- घेवाण बाबत अमित आणि सुरेंद्र यात चर्चा झाली. रक्कम घेतेवेळी सुरेंद्र यांनी रकम ना घेता वाहतूक विभाग खापरखेडा पोलीस स्टेशन येथे कार्यरत अमोल काळे यांना पैसे घेण्यास सांगितले.

अमोल काळे यांनी रक्कम हातात घेल्यानंतर लगेच एसीबी च्या पथकाने अमोल यास रंगेहाथ पकडले. सुरेंद्र ठाकरे लाही पोलीस स्टेशनच्या आवारातून एसीबी पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाही एसीबी चे एसपी रश्मि नांदेड़कर आणि अपर एसपी राजेश दुधलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगिता चाफले , पोलीस निरीक्षक विनोद आडे , कर्मचारी रविकांत डहाट , सुनील कळंबे , प्रवीण पडोळे , अनिल , मंगेश कळंबे , सरोज बुधे , अस्मिता मेश्राम यांनी केली.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …