*विद्युत धक्क्याने बैलाचा मृत्यू* *वरोरा बाजार समिती समोरील घटना*

*विद्युत धक्क्याने बैलाचा मृत्यू*

*वरोरा बाजार समिती समोरील घटना*

वरोरा प्रतिनिधी मूजम्मील शेख

वरोरापीडित शेतकरी आपल्या शेतीची कामे आटोपवून दोन बैलांना घेऊन ,घराकडे येत असतांना बाजारसमिती समोर ,रहदारीचे रस्त्याचे कडेलाअर्थीग वायर तार होता.त्याठिकाणी पाणी साचले होते.अलगद बैल त्या ठिकाणावरून गेला.आणि फेस ताराला आर्थिग तार टच असल्याने,बैलाला विद्युत धक्का बसला.आणि बैलाचा मृत्यू झाला. आणि शेतकरी सुद्धा थोडक्यात बचावला .शेतकऱ्याने स्वतःला सावरले नसते तर मोठा अनर्थ घडला असता .पीडित पशु पालकांचे नाव शामराव बाळाजी बोढे ,खांजी वॉर्ड वरोर.

वरोरा शहर व परिसरात 14 जुलैला जवळपास दोन तास पाऊस पडला,तर 15 जुलैला तीन तास पावसाच्या सरी बरसल्या.त्यामुळे पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचले.विद्युत लाइन ची अर्थीग तार काही ठिकाणी साचलेल्या पाण्याच्या विळख्यात असून,सदर बैलाच्या मृत्यूची घटना घडली,त्या घटनास्थळावर अर्थीग तार हा फेस ताराला टच असल्यामुळे,बैलाला विजेचा धक्का बसला असून त्यात त्याचा मृत्यू झाला असल्याचे समजते.
घटनास्थळाला विद्युत महामंडळाचे सहा .अभियंता चुक्का यांनी भेट दिली. विद्युत विभागाची चूक लपविण्यासाठी अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी असलेल्या पोलना आर्थिग नव्हती त्या पोलला बैलाच्या मृत्यूची घटना घडल्यानंतर अर्थीग लावण्यात आली.त्यावेळेस विद्युत महामंडळाचे गलथानपणामुळे माझ्या बैलाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप पीडित शेतकऱ्याने केला असून,मला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

शेती हंगामात पीडित शेतकऱ्यासमोर संकट
पीडित शेतकऱ्याची बाजार समितीचे मागे शेत असून,पिकाची डवरणी सुरू होती. पावसामुळे लगबगीने काम आटोपून,दोन बैलांना घेऊन शेतकरी घरी जात असतांना, एक बैल आर्थिग ला टच झाल्याने,त्याचा जागीच मृत्यू झाला.त्यामुळे ऐन शेती हंगामात पीडित शेतकऱ्यासमोर संकट उभे राहिले आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …