*वैधकीय अधिकारीमुळे कर्मचारि व ग्रामस्थांचा वाढला मनस्ताप*

*वैधकीय अधिकारीमुळे कर्मचारि व ग्रामस्थांचा वाढला मनस्ताप*

खात प्रतिनिधि-तुषार कुंजेकर

खातखात येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गरोदर महिला बाळतपणाला गेली असता तिला अचानक श्वास वाढायला सुरुवात झाली असता तिला कर्तव्यावर असलेले डॉक्टर धुर्वे यांनी जिल्हा रुग्णालय भंडारा येथे हलविन्यास सांगितले मात्र येथिल वैधकिय अधिकारी डॉ.कल्पना मून यांनी आपल्या गैरउपस्थितीत आरोग्य सेवीकेला फोनद्वारे सांगितले मी सांगीतल्या शिवाय रुग्णास जिल्हा रुग्णालय येथे हलउ नये असे सांगितले.
गरोदर महिला यामीणी गौरिशंकर तांबुलकर या महिलेस बाळतपणाकरीता प्रा.आरोग्य केंद्रात दाखल केले असता तिचा स्वासोस्वास वाढत असल्याने येथिल कर्तव्यावर असलेले डॉ.धुर्वे यांनी महिलेला जिल्हा रुग्णालय येथे हलविन्यास सांगितले असता रुग्णास ६:५५ वाजता रात्रीला (रेफर स्लीप ) देण्यात आली परंतु गैरउपस्थित असलेले वैद्यकिय अधिकरी डॉ.कल्पना मून यांनी आरोग्य सेविका यांना फोन वरून सांगितले की महिलेला (डाय्क्लो) लावा आणी डॉ.धुर्वे यांना सांगायच नाही मी फोन केला म्हणून आणी ते काय उपचार करातात ते मला सांगा आरोग्य सेविका यांनी सांगितले की रुग्णास खुप त्रास होत आहे आणी तिचे प्रथम बाळतपण हे शिजर झालेले होते व तिला त्रास जास्त प्रमानात असल्याचे सांगितले वैधकिय अधिकारी डॉ.मून हे आयकन्याच्या स्थितीत नसुन माझा फोन येई पर्यंत रुग्णवाहीका देण्यास नकार दिला.
महिलेच्या नातेवाईकानी येथिल जिल्हा परिषद सदस्य राधा अग्रवाल व सरपंच ज्योती डहाके यांना फोन लाऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलाविले नंतर रुग्णवाहिकेने महिलेला जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले जि.प.सदस्य व सरपंच यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पहाणी केली असता येथिल आरोग्य सेवक बेहनिया दारू पिऊन धिंगाना घालत असल्याचे लक्षात येताच वैधकिय अधिकारी डॉ.मून यांना फोन करून प्रकार सांगन्यात आला मात्र त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले प्राथमिक आरोग्य केंद्राची परीस्थिती लक्षात घेताच जि.प.सदस्य योगेश देशमुख, उपसभापती रक्षा थोटे, माजी पं.स.सदस्य मुकेश अग्रवाल, ग्रा.पं.सदस्य अरविंद तांबुलकर, महेश गिर्हेपुंजे उपस्थित झाले पोलिसांना फोन करून बोलाविले व धिंगाणा घालत असलेल्या आरोग्य सेवक बेहनिया यांच्या विरुध्द तक्रार पो.स्टे.अरोली येथे देण्यात आली.
जिल्हा परिषद सदस्य राधा अग्रवाल यांनी दुसऱ्या दिवशी वैधकिय अधिकारी यांच्याशि चर्चा करण्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता रात्रीला घडलेल्या प्रकार सांगत असता वैधकिय अधिकारी दारू पिऊन धिंगाणा घालत असलेल्या आरोग्य सेवक बेहनिया यांची बाजू घेत म्हणाले की तुम्ही लोकप्रतिनीधी आहात तर मी सुद्दा ” क्लास वन” अधिकारी आहे अशा जवाब दिला त्यामुळे परिसरात वातावरन तापलेले असुन वैधकिय अधिकारी यांची तात्काळ बदली व्हावी अशी मागणी केली या आरोग्य अधिकरी मुळे कुणाच जिव जाईल याचा नेम नाही अशा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
येथिल कर्मचारी आपल्या कर्तव्यावर राहून रुग्णांची देखभाल व चांगल्या प्रकारची सेवा देतात परंतु वैद्यकिय अधिकारी डॉ.मून मानसीक त्रास देण्यात सुरवात केली येथिल जबाबदार कर्मचारी मात्र त्रस्त अवस्थेत काम करत असल्याचे बोलले जात आहे आणी बेजबाबदार आरोग्य सेवक बेहनिया यांची बाजू घेत माझ्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी खोटी तक्रार माजी पं.स.सदस्य मुकेश अग्रवाल यांच्या विरोधात दिली. जबाबदार कर्मचारी यांची बाजू घेत ग्रामस्थांनी वैद्यकिय अधिकारी मून व आरोग्य सेवक बेहनिया यांचा बदली विषयी मागण्या केल्या अन्यथा आंदोलन करू अशा इशारा देखिल ग्रामस्थांनी केला.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …