*मौद्यात आंगनवाडी सेविका निघाली कोरोना पॉजिटिव्ह*
*आतापर्यंत ही दुसरी केस*
उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे
मौदा : नुकताच उत्तर प्रदेश वरून एनटीपीसीत कामासाठी आलेला इसम कोरोना पॉजिटिव्ह निघाला व त्याला नागपूर येथील कोव्हिड-१९ केअरला पाठविण्यात आले. आणखी दुसरा कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले.
दि.१६ जुलै रोजी दुपारी दोन वाजता च्या दरम्यान मौदा येथिल हनुमान नगर स्थित वॉर्ड क्रमांक ६ मधील आंगणवाडी सेविका पॉजिटीव्ह निघाली. त्यामुळे उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर, तहसीलदार प्रशांत सांगडे व मुख्याधिकारी कोमल कराळे यांनी तातडीने धाव घेऊन परिसर सील केले.
मौद्यात कोरोना स्फोट होण्याची शक्यता
प्राप्त माहितीनुसार सदर महिला आंगणवाडी सेविका असून कोरोना सर्व्हेचा काम करीत होती. दोन दिवसाआड ५० घरांचा सर्व्हे करीत होती. आंगणवाडी सेविका असल्यामुळे लहान मुलांना व गरोदर महिलांना पोषण आहार वितरण करायची. त्याचप्रमाणे पतीदेव मौदा येथील हिंडाल्को कंपनीत कार्यरत आहेत. तर मुलगा एनटीपीसीप्रकल्पात कामाला आहे. आणि सुन पंचायत समिति मध्ये बालकल्याण विभागात काँम्पूटर ऑपरेटर म्हणुन कार्यरत आहे. यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची यादी काढून घरी विलगिकरण करून कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. जर का रिपोर्ट पॉजिटीव्ह निघाल्यास मौद्यात कोरोना स्फोट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुखपट्टया लावून शारीरिक अंतर पाळा, कोरोना संसर्गाला आळा याप्रमाणे नागरिकांनी घाबरून न जाता शासनाने वेळोवेळी सुचविलेल्या कोरोना संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करून अनावश्यक बाहेर पडणे टाळावे. कोरोनाचे लक्षणं दिसू लागल्यास तातडीने स्थानिक प्रशासनाला कळविण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर व तहसीलदार प्रशांत सांगळे यांनी महाराष्ट्र न्युज मीडीयाशी बोलताना केले आहे.