*शासकीय कामकाजात अळथळा निर्माण करणार्या राहुल अधिकरण सावजी ला कोर्टातुन शिक्षा*
*दोन वेगवेगळ्या कलमा अंतर्गत विद्देमान कोर्ट उठे पर्यंत व 20 हजार रुपये दंड,तर दुसर्या कलमा अंतर्गत विद्देमान कोर्ट उठे पर्यंत शिक्षा व पाचशे रुपये दंड*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
सावनेर– *पो.स्टे. सावनेर:- पो.स्टे. सावनेर दिनांक 21/04/2017 चे 19.14 वा. दरम्यान फिर्यादी नामे प्रमोद बालमुकंद कुमार वय 56 वर्ष रा. प्लाॅट क्रमांक 2 शंभु नगर झिंगाबाई टाकळी, नागपूर यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. सावनेर येथे अप. क्र. 128/2017 कलम 353,186,504,506,34 भादवी सह कलम 3 म.शा.मा.नुकसान अधिनियम गुन्हा नोंद झालेला होता.*
*दिनांक 20/04/2017 चे 21.00 वा. आरोपी नामे राहुल अधीकरण सावजी वय 33 वर्ष रा. भंसाळी टाकळी, नागपूर याने रेल्वेचे काम सुरू असतांना जेसीपीने मुरूम पसरवित असतांना आरोपीने जेसीपी चालक यास गावात बोलावुन प्रायव्हेट काम करण्यास सांगीतले. परंतु चालकाने नकार दिल्याने त्यास शिवीगाळ करून जेसीपीचे काच फोडुन नुकसान करत त्यास जिवाने मारण्याची धमकी देुवन शासकीय काम बंद पाडत आपल्या दबंगगीचे परिचय दीला होता*
*आरोपीला दिनांक 25/04/2017 चे 11.30 वा. दरम्यान अटक करण्यात आली होती.सदर प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार श्री.नारायण बोरकर, पो.स्टे. सावनेर यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. कोर्टामध्ये सादर केले होते.*
*आज दिंनाक 17/07/2020 रोजी मा. कोर्ट विद्यमान न्यायाधीव श्री. सुनिल पाटील, अतिरीक्त सत्र न्यायाधिश, नागपूर, यांनी वरील नमुद राहुल अधिकरण सावजी या आरोपीला 1) कलम 427 भादंवि. मध्ये कोर्ट उठेपर्यंत साधी कैदेची शिक्षा व 20,000/- रू. दंड, दंड न भरल्यास 1 महिना कैदेची शिक्षा, 2) कलम 341 भादंवि मध्ये कोर्ट उठेपर्यंत साधी कैदेची शिक्षा व 500/- रू. दंड, दंड न भरल्यास 5 दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.*
*सरकारचे वतीने एपीपी श्री. डगोरीया यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अधिकारी म्हणुन सहायक पोलिस निरीक्षक संजय खोकले तर कर्मचारी सहा.फौज.शंकरराव तराळे, वासुदेव मस्के, भवानीप्रसाद मिश्रा, पोहवा मनोज तिवारी, शेखर मेश्राम, पोना महेंद्र सहारे यांनी मदत केली आहे.*
*आज मा.न्यायालयाने आरोपी राहुल अधिकरण सावजी रा.भंसाळी टाकळी यास शिक्षा सुनवताच स्वतालाः समाजसेवी सांगून शासकीय कामात अडथडे निर्माण करुण स्वताची ख्याती प्राप्त करु इच्छिणाऱ्यांचे धाबे चांगलेच दनानले आहे*