*वडोदा येथील श्री स्वामि नारायण गुरुकुल आंतरराष्ट्रीय शाळेचा निकाल १०० टक्के*

*वडोदा येथील श्री स्वामि नारायण गुरुकुल आंतरराष्ट्रीय शाळेचा निकाल १०० टक्के*

उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे

मौदा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) तर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा दा. १५ जुलै रोजी दुपारी एक वाजता निकाल जाहीर झाला.

या परीक्षेत श्री स्वामि नारायण गुरुकुल आंतरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. याबद्दल प.पू.मुक्तवल्लभ दासजी स्वामी व प्राचार्य एच.कृष्णकिशोर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या परीक्षेत पार्थ सूचक 95.40%(प्रथम), क्षितिज कामडी 92.5%(द्वितीय) व ओम शेंडे 89.92% (तृतीय) क्रमांक पटकावला आहे. युवराज जैस्वाल याने गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहे. तर विनय अवघाते, आर्यन मोंडल, दीप हटवार, जेनीश बुवा, प्रथम रेवनवार, प्रज्वल वाडीभष्मे, प्रहर्ष बावनकर, वंश हेडाउ, प्रज्वल चिंचालकर, श्रियाम दहिकर, चैतन्य पांडे, शंतनू चव्हाण, मिथेश ठुमर, कोविद शर्मा या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत प्रथम श्रेणीत आले आहेे. गुरकुलची परंपरा जोपासत या शाळेने यावर्षी १०० टक्के निकाल दिला आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे पालकांनीही यावेळी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या यशाबद्दल प.पू.मुक्तवल्लभ दासजी स्वामी, प्राचार्य कृष्णकिशोर, करण मल्होत्रा, गोविंद शिंदे, नीतीन नंदेश्वर, दिनेश मिश्रा, प्रदीप रामटेके, हरीश मेश्राम, राहुल खातरकर, विवेक खोडे, अक्षय आकरे, पलाश जैस्वाल, राजेश लांजेवार, धिरेंद्र शेंडे, निशांत लाले, भारतभूषण शास्त्री, कोमल मेश्राम तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Check Also

*डॉ विनिशा ने किया परिवार का नाम रोशन* *स्नातक की उपाधि प्राप्त कर सावनेर वासियोका मान बढ़ाया*

🔊 Listen to this *डॉ विनिशा ने किया परिवार का नाम रोशन* *स्नातक की उपाधि …