Breaking News

*जलतारा अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील स्वयंसेवी*

*जलतारा अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील स्वयंसेवी*

मुख्य संपादक- किशोर ढूँढेले
सावनेर – तालुक्यातील पाणी टंचाई ने ग्रसीत गावातील शेतीत जलतारा अभियान राबवून पाणी अडवा पाणी जिरवा या घोषवाक्यास मुर्तरुप देण्याच्या हेतुने जलतारा स्वयंसेवींची एक सभा आयोजित करुण तालुक्यात प्रथमच सुरुवात करण्यात आली.


काळाची आवश्यकता असलेल्या या जलतारा अभियान साठी जवाहर कन्या हायस्कूल येथील मदन डहाके यांच्या निवासस्थानी आयोजित सभेला जवळपास 50 जलतारा स्वयंसेवकच्या उपस्तिथीत मोठ्या उत्साहात पार पडली यात पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन, आर्थिक नियोजन, शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचारी सोबतच दुष्काळग्रस्त भागात सदर योजना राबविण्याकरीता चर्चा झाली.


उपस्तिथीत सर्व मान्यवारांनी आपल्या आपली मत व्यवस्थेबद्दल, नियोजनाबद्दल आणि जलतारा मोहीम कशी राबवता येईल याबाबाद सविस्त्तर चर्चा झाली आपण या सामाजिक आणि अत्यंत गरज असलेल्या मूलभूत प्रश्नावर एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येऊन जलतारा अभियान यशस्वी करण्याचा संकल्प घेत. मा. तहसीलदार, मा. उपविभागीय अधिकारी ,कृषि अधिकारी ,विस्तार अधिकारी आदींशी भेट घेऊन कामाला सुरुवात करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.


याप्रसंगी मदन डहाके, भुषण कुबडे, राजु घुगल, हितेश बनसोड, किशोर ढुंढेले, अभिषेक गहरवार,कोल्हे गुरुजी,विजय ठाकरे, वत्सल बांगरे, लीलाधर महाजन, भाऊ गोतमारे, महेश टेकाडे, किशोर चौधरी, हरीश भुरे, किशोर जुम्बडे, निसर्ग पवार, भुणेश्वर बोबडे, रमेश कुबडे, जितेंद्र कोहळे, बाळू मेश्राम, दिलीप नारनवरे, हरीश मोहातकर, भावेश वाखोरे, पवन पाटणे, दुशांत खुरसंगे, भूषण ढोके, सोहम गोतमारे, रणवीर गजभिये , वैभव फुलारे, निखिल पोटभरे, अजय महाजन, रुपेश कमाले,शेखर मोवाडे,सोहम गोतमारे इत्यादी जलतारा स्वयंसेवी उपस्थित होते.

Check Also

*दुखदः निधन – समाजसेवी हितेश बनसोड यांचे वडील व्यापारी नंदकुमार श्रावणजी बनसोड यांचे निधन*

🔊 Listen to this *दुखदः निधन*   *हितज्योती आधार फाऊंडेशनचे समाजसेवी हितेश बनसोड यांचे वडील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *