Breaking News

*लोकलढ्याला यश: जांभुळखेड्यात ३४४ एकर शेतीचे सिंचन करणाऱ्या तलावाची निर्मिती; जिल्हाधिकाऱ्यांनी केले जलपूजन*

*लोकलढ्याला यश: जांभुळखेड्यात ३४४ एकर शेतीचे सिंचन करणाऱ्या तलावाची निर्मिती; जिल्हाधिकाऱ्यांनी केले जलपूजन*

गड़चिरोली प्रतिनिधि-सूरज कुकुड़कर

गडचिरोली/कुरखेडा- वन कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या जांभुळखेडा येथील सिंचन तलावासाठी गावकऱ्यांनी उभारलेल्या लढ्याला यश आले असून, तलावासोबत कालव्याचे कामही पूर्ण झाले आहे. आज जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते जलपूजन झाल्यानंतर शेतीसाठी पाणी सोडण्यात आल्याने जांभुळखेडावासीयांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी आमदार कृष्णा गजबे,माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंग चंदेल,उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे, सिनेट सदस्य चांगदेव फाये, तहसीलदार सोमनाथ माळी, गट विकास अधिकारी अनिता तेलंग, जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता भूमेश दमाहे, उपविभागीय अभियंता मनोहर कुंभारे, वनपरिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के, सरपंच शिवाजी राऊत व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते

जांभुळखेडा गावाच्या पूर्वेस दोन किलोमीटर अंतरावर ४० हेक्टर जागेत असलेला सिंचन तलाव वन कायद्याच्या कचाट्यात सापडला होता. दरम्यान १९८५ च्या पावसाळ्यात पाळ फुटल्याने तलावाचे अतोनात नुकसान झाले. तेव्हापासून शासनाचे या तलावाकडे पार दुर्लक्ष झाले होते. मात्र जांभुळखेडा येथील नागरिकांनी तलावाची सिंचन क्षमता आणि पाण्याचे महत्त्व ओळखून लढा उभारला. माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंग चंदेल यांनी गावकऱ्यांच्या लढ्याला सहकार्य केले. श्री.चंदेल यांच्या प्रयत्नाने २०१६ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी श्री.नायक व उपवनसंरक्षक श्री.होशिंग यांनी तलावाच्या कालव्यासाठी एक हेक्टर जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे सिंचन तलाव पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला.

मात्र, पाळ फुटल्याने नुकसान झालेल्या तलावाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च येणार होता. लघुसिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता मनोहर कुंभारे यांनी ही अडचण दूर केली. त्यांनी मनरेगाच्या माध्यमातून हे काम पूर्ण करून १४ हजार मनुष्यबळ दिवस इतका रोजगार उपलब्ध करून दिला. तलावाच्या कालव्याची लांबी २१०० मीटर असून या तलावाच्या पाण्यामुळे यावर्षीच्या ३४४ एकरातील खरीप हंगामासाठी सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे. एकूणच हा तलाव शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याने जांभुळखेडावासीयांनी आनंद व्यक्त केला आहे.

*गावकरी, राजकीय नेते आणि अधिकारी यांनी एकत्र येऊन काम केले तर काय परिवर्तन होऊ शकते, याचे जांभूळखेड्याचा तलाव हे उत्तम उदाहरण आहे.*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …