Breaking News

*नागपुरात २५ व २६ जुलै  ‘जनता कर्फ्यू’* *महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांची मोठी घोषणा*

*नागपुरात २५ व २६ जुलै  ‘जनता कर्फ्यू’*

*महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांची मोठी घोषणा*

*महापालिकेत झालेल्या या बैठकीत शहरात लॉकडाउन लावण्यापूर्वी नागरिकांना दोन दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यावर चर्चा झाली. तासभर चाललेल्या बैठकीनंतर महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संयुक्तपणे 25 आणि 26 तारखेला जनता कर्फ्यू लावण्यात येईल, असे सांगितले*

नागपूर : शहरात सातत्याने कोरोनाबाधित आणि बळींची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरावर लॉकडाउनचे संकट घोंगावत असतानाच महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी “जनता कर्फ्यू’ची घोषणा केली. शनिवार आणि रविवारी शहरात जनता कर्फ्यू लागू राहील. अचानक केलेल्या घोषणेमुळे नागपूरकरांची तारांबळ उडणार आहे.

लॉकडाउनसंदर्भात गेले काही दिवसांपासूह चर्चा सुरू आहे. आयुक्तांनीही लॉकडाउनचे संकेत दिले आहे. या पार्श्‍वभूमीवर महापौर संदीप जोशी यांनी शुक्रवारी शहरातील सर्व आमदार, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त पोलिस आयुक्त नीलेश भरणे व इतर अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती.

महापालिकेत झालेल्या या बैठकीत शहरात लॉकडाउन लावण्यापूर्वी नागरिकांना दोन दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यावर चर्चा झाली. तासभर चाललेल्या बैठकीनंतर महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संयुक्तपणे 25 आणि 26 तारखेला जनता कर्फ्यू लावण्यात येईल, असे सांगितले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …