*कृषीपंप बंद…. विजेचे वाढीव बिल सुरू*

*महावितरणाचा अजब कारभार*

*मिटरच नाही तर बिल कशाचे ?*

*शेतकरी त्रस्त*
प्रतिनिधि- संदीप तलमले
*पिपळा( डाक बंगला): * एकीकडे महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंतची कर्जमाफी करत आहे तर दुसरीकडे सावनेर तालुक्यातील पिपळा डाक बंगला परिसरात शेतातील सतत येणाऱ्या तिमाही वाढीव वीज बिलामुळे शेतकरी राजा त्रस्त असून विजेचा वापर केला नसलेल्या शेतीचे बिल भरायचे कसे ?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पिपळा गावालगतच पाटनसावंगी व पिपळा कोळसा खदान आहे खाणीलगतच असलेल्या शेतातील विहिरी सात-आठ वर्षापूर्वीपासून आटलेल्या असून कुठलीही लागवड सोय नसल्याने शेतकऱ्यांनी ओलीत शेती करनेही बंद केले आहे माळव पिक पाण्या अभावी घेऊ शकत नाही तसेच विहिरीतले मोटर पंप निकामी झाले असून शेतातील काही विहीरी जमीनदोस्त झालेल्या आहे बहुतेक शेती ही नैसर्गिक पाण्यावर अवलंबून असून शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न कमालीचे कमी झालेले आहे
आमच्या प्रतिनिधि नी प्रत्यक्षात बांध्यावर जाऊन पाहणी केली असता शेतातील विहिरीत पाणी नसल्याने,शेतकऱ्यांचा विद्युत वापर बरेच वर्षापासून बंद आहे व काहीचे वाढिव बिल न भरल्याने महावितरण अधिकाऱ्यांनी शेतातील सर्विस वायर सह विद्युत मीटर सुद्धा काढून नेले तरीही कोणतेही मिटर रीडिंग न घेता दर तीन महिन्याला बरेच वर्षापासून अंदाजे वाढीव बिल शेतकऱ्यांच्या पदरी पडते
काशिनाथ नरड यांच्याकडे मागील दहा वर्षापासून शेतात विहीर,कृषिपंप व मीटर सुध्दा नाही तरीही तिमाही वाढीव बिल आजही नियमित येत आहे तसेच मीटरमध्ये प्रत्यक्षात युनिट कमी असून बिलात युनिट रीडिंग जास्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर पन्नास ते साठ हजार जवळपास विजेचे बिल थकबाकी आहे रीडिंग प्रमाणे आलेले बिल आम्ही भरण्यास तयार आहे अशी माहिती शेतकऱ्यांनी .
आधीच कोरोना,नापिकी,ओल्या दुष्काळ,व शेतमालाला भाव मिळत असल्याने शेतकरी कर्ज संकटात असून विज वापरलीच नाही तर बिल भरायचे कसे ? असा सवाल उपस्थित झालेला आहे
पाटणसावंगी खदान व पिपळा खदान परिसरामध्ये डब्ल्यूसीएल मार्फत भूगर्भातील पाणी निकासी करीता दोन बोअर लावण्यात आलेले होते त्यामुळे जवळपास दीडशे एकर शेतीच्या संपूर्ण विहिरीचे पाणी जवळपास दहा वर्षाआधी आटले बोर सधयस्थितीत बंद झाल्याने विहिरीला दोन ते तीन फूट पाणी झऱ्या मार्फत येणे सुरू झालेले आहे निसर्गाचा कहर असतानाही शेतकऱ्यांनी ओलीत शेती करण्याकरता महावितरण विभागाला विज सुरू करण्यासाठी तगादा लावला असता आधी विजेचे बिल भरा नंतर वीज सुरू होईल असे विभागतर्फे कळविण्यात आले
संबंधित निवेदन प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना देण्यात आले महाराष्ट्र उर्जामंत्री नागपूरचे असल्या नंतरही शेतकऱ्यावर शासनाकडून मोठा अन्याय होत आहे शासनाने वाढीव बिल माफ करावे अशी मागणी शत्रुघ्न सावरकर,दिलीप कुंभलकर,नारायण कुंभलकर,कृष्णा तलमले,विठ्ठल सावरकर,हेमराज
बावनकुळे,शांताराम पाहुणे,गजानन भोरे,अशोक पाहुणे,मंदा दोडके,भालचंद्र कुम्भलकर,शालिक सावरकर,बबन वाठ,संजय पंडे,जानबा ठाकरे,काशिनाथ नरड,मोरेश्वर सावरकर,शंकर तलमले,बापूराव मैद,अमर भोरे,गिरधर बागड़े,महादेव कुंभलकर,रामभाऊ वाठ,भाऊराव पाटील,देवेंद्र सावरकर,मारोती तलमले,शंकर ठाकरे,दीपक वाठ,चिरकूट भोयर,मारोती वाठ,यांनी केली.
Maharashtra News Media सच की आवाज