*हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढू: ७३ व्या वर्धापन दिनी शेकापचा निर्धार*
गड़चिरोली जिल्हा प्रतिनिधि-सूरज कुकुड़कर
गडचिरोली: शेतकरी कामगार पक्षाचा ७३ वा वर्धापन दिन काल येथे अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांच्या हस्ते पक्षाचा लाल बावटा ध्वज फडकाविण्यात आला.
देशात आणि राज्यात सत्ताधारी आणि प्रमुख विरोधी पक्ष हे भांडवलदार धार्जिने असल्याने सामान्य माणसाच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आता रस्त्यावरच्या आंदोलनाची स्वतंत्र भूमिका घेऊन सामान्य जनतेचा लढा उभारणे गरजेचे आहे,असे मत शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी यावेळी व्यक्त केले.
धानाला ३ हजार ५०० रुपये हमीभाव मिळाला पाहिजे, अन्यायकारक टाळेबंदीमुळे रोजगार हिरावलेल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना काळात मासिक रुपये १० हजार रुपयांची मदत मिळाली पहिजे, टाळेबंदीच्या काळातील घरगुती व शेतीची वीज बिले माफ झाली पाहिजे, मच्छीमार सहकारी संस्थांच्या झालेल्या नुकसानीपोटी या संस्थांना हेक्टरी १ लाख रुपयेप्रमाणे मदत मिळाली पाहिजे, गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना शेतीवर आधारित व्यवसायाकरिता १० लाखांचे कर्ज कोणत्याही अटी व शर्तीविना मिळण्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा या जनसामान्यांच्या प्रश्नांवर जिल्हा स्तरावर व्यापक आंदोलनात्मक जनसंघर्ष उभारण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
तत्पूर्वी पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी फेसबूक लाईव्हवरुन राज्यभरातील कार्यकर्त्यांना पक्षाचा वैचारिक वारसा घेऊन जन सामान्यांसाठीचा लढा तीव्र करण्याचे आवाहन केले. यावेळी पक्षाचे जिल्हा खजिनदार शामसुंदर उराडे, जिल्हा सहचिटणीस भाई रोहिदास कुमरे,डॉ. गुरुदास सेमस्कर,चंद्रकांत भोयर,अक्षय कोसनकर, गजानन अडेंगवार,सोनूजी साखरे,महिला नेत्या जयश्री वेळदा,विजया मेश्राम, मंदाकिनी आवारी,पुष्पा चापले, ज्योत्स्ना चिचघरे,पुष्पा कोतवालीवाले प्रामुख्याने उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज