*संवर्धनासहित वृक्षारोपणाच्या एक वर्ष पूर्तीबद्दल झाडांचा वाढदिवस साजरा*
*स्वप्नील श्रावनकर यांचा निसर्गाप्रती एक आगळा वेगळा उपक्रम*
प्रतिनिधि तुषार कुंजेकर
मौदा:- मैत्रीदिनाची अनोखी मिसाल तयार करून रेवराल गावातील काही तरुण सहकारी मित्रमंडळीनी *रेवराल ग्रामविकास कृती समितीे* तयार करून गावातील स्मशानभूमीत श्रमदानातून सौंदर्यीकरण करण्याचा दृढ निश्चय मागील वर्षीपासून केला होता. त्यानंतर रेवराल ग्रामविकास कृती समिती मार्फत स्मशानभूमीचे सौन्दर्यकरण करण्यासाठी मागील वर्षी वृक्षारोपण केले होते. वृक्षारोपणासाठी अरोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक विवेकजी सोनावणे यांनी त्यावेळी काही रोपटे उपलब्ध करून दिले होतेेे व रेवराल ग्रामविकास कृती समितीच्या प्रत्येक सदस्यांडून काही रोपट्यांची लागवड करण्यात आले होते. आज या रोपट्यांचे चांगल्या झाडांत रूपांतर होऊन एक वर्ष पूर्ण झाला असल्याने आरोलीचे पोलीस निरीक्षक विवेक सोनवाणे यांचे आभार मानून झाडांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला. वृक्षारोपणाच्या वेळी रोपटे अतिशय लहान असल्याने व स्मशानभूमी येथील जागा कोरडी व रेताड होती तथा पुलाचे सिमेंटिकरणाचे काम झाल्याने तेथील सिमेंट रोडवरील लोह्याचे तुकडे इत्यादी साहित्य जमिनीत अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले होते. स्मशान भूमीतील जागा झाडांच्या वाढीकरिता साजेशी नसल्याची दिसून येताच झाडांच्या लागवडीपेक्षा झाडांची जोपासना करणे अधिक अवजड कर्तव्य आहे असे कृती समितीच्या लक्षात आले, त्यामुळे प्रत्येक रविवारी श्रमदानातून स्वच्छ ,सुंदर,हिरवीगार भूमी तयार करण्याची महत्त्वकांक्षी शपथच ग्रामविकास कृती समितीतील सदस्यांनी घेतली व त्यातून झाडांचे संगोपण करण्यास सुरूवात केली. आतापर्यंत ४० रविवार दिवशीं श्रमदानातून एक तास श्रमदान गावासाठी आपल्या माणसासाठी या तत्वावर चालविले. यात सर्वात कठीण काळ म्हणजे उन्हाळा होता कारण पाणी टंचाई व रोपट्यांना पाणी मुबलक प्रमाणात न मिळणे, यामुळे आमच्या सर्वांच्या मेहनतीवर पाणी फेडणे झाले असते म्हणून आम्ही मोटर पपं 400 मिटर लांब वीज पुरवठा करून लावून घेतले. त्याचप्रमाने लोकवर्गणीतून वृक्ष संवर्धनासाठी जाड्या घेतल्या,जागेची उपलब्धता निरीक्षण करून,लोकवर्गणीतून मुरूम टाकून घेतले व श्रमदानातून त्या जागेची विनियोगीता केली, राज्य शासणाच्या माध्यमातून, विजेची समस्या निकाली काढली,आता गावातूनच वीज पुरवठा होणार आहे अशी माहिती रेवराल ग्रामविकास कृति समितीचे संयोजक तथा पंचायत समिती सदस्य स्वप्नील श्रावणकर यांनी दिली. आतापर्यंत कमीजास्त प्रमाणात झाडांची वाढ होत असल्याने कमी जास्त उंचीचे झाडे दिसावयास आलीत आणि आता पुढील 50 रविवार श्रमदानातून एक सुंदर,स्वच्छ, हिरवीगार स्मशानभूमी गावाकरिता तयार करून देण्याचे ध्येय रेवराल ग्रामविकास कृती समितीच्या तरुण मंडळाने घेतला आहे.
यापुढेही आव्हान खूप आहेत परंतु सर्व गावकऱ्यांच्या साथीने आम्ही सर्व तरुण मंडळी आपल्या गावाकरिता श्रमदानातून व लोकवर्गणीतून स्वच्छ,सुंदर भूमी तयार करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहोत असे मत पंचायत समिती सदस्य स्वप्नील श्रावणकर यांनी व्यक्त केले. रेवराल ग्रामविकास कृती समितीमध्ये पं. स. सदस्य स्वप्नील श्रावनकर यांचेसहित सरपंच चिंतामण मदनकर, संजय कोठे, सौरभ भोयर, विशाल श्रावनकर, सचिन शेंडे,प्रभाकर लेदे,रितिक ठाकरे,रोशन माली,प्रफुल वंजारकर,लोकेश पटले,प्रशांत चौहान,तुषार लोणकर,अंकित श्रावनकर,सतीश नन्दम,आशिष चोले,रमेश हरकडे,रोहित मारबते,निलेश उरकुडे,अक्षय कवडे,कमलेश श्रावनकर,तेजस श्रावनकर,ऍड हरीश आंग्रे,डाँ अमित श्रावनकर, राजू नागफासे,शुभम गायधने,सुनील श्रावनकर,अंकित शेंडे,रोहित मदनकर,सागर पतीये, आशिष कोठे,प्रवीण वडीचार,दीपक भलावी,अमोल नेतांम,नितेश मदनकर इत्यादींची मोलाची भूमिका होती व इतरही रेवराल गावातील सदस्यांने स्मशानभूमी सौन्दर्यीकरण करण्याकरिता सहभाग केले होते.
निसर्ग आपल्याला निशुल्क काही देत असतो त्यामुळे निसर्गाचे संतुलन टिकवून ठेवणे हे मी माझे कर्तव्य समजतो.
– स्वप्नील श्रावणकर, सदस्य पंचायत समिती मौदा
Maharashtra News Media सच की आवाज