*शासन शेतकऱ्यांकडे लक्ष देणार काय?*
*चक्रिवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या. आपचे तहसीलदारांना निवेदन*
प्रतिनिधि- तुषार कुंजेकर
मौदा : पावसाने दमदार व वेळेवर सुरूवात केल्यामुळे बळीराजाच्या यंदाच्या खरीप हंगामाबाबत आशा पल्लवित झाल्या, तथापि, कोरोनाचे संकट घोंगावत असतानाच खरिप हंगाम तोंडावर आला आहे.शेतकर्यांच्या घरातील कापूस व तत्सम माल विकला गेला नसल्यामुळे खरिपासाठी बियाणे, खते व औषधे खरेदीसाठी शेतकऱ्याकडे पैसे नाहीत.
शेतकऱ्यांची पिककर्ज द्या, असे मुख्यमंत्र्यांच्या सुचना आहेत तसेच पिककर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होतील असे गृहमंत्र्यानी सांगितले आहे. तरीही राष्ट्रीयीकृत बँका कर्जवाटपाबाबत अजिबात गंभीर नाहीत. पिककर्ज वेळेत न मिळाल्याने शेतकऱ्यांना खाजगी सावकारकडे गेल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे सरकारने खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज मिळणे आवश्यक आहे. विशेष बाब अशी की, शेतकऱ्यांनी महाबीज, कृषीधन, ग्रीनगोल्ड इत्यादी नामांकित कंपन्यांकडून बियाणे खरेदी करून पेरले ते रूजलेच नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले.
त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ पिककर्ज मिळण्यासाठी राष्ट्रीयकृत तथा सहकारी बँकावर कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सुचना देऊन पिककर्ज न देणाऱ्या बँकावर त्वरीत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. दुबार पेरणीचे संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांचे शेतीचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी. निकृष्ठ बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. त्याचप्रमाणे कोकण किनारपट्टी चक्रिवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशा आशयााचे निवेदन आम आदमी पार्टी मौदा तालुक्याचे वतीने मुुख्यमंंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार मौदाचे माध्यमातून देण्यात आले. निवेदन देतांना आम आदमी पार्टी नागपूर जिल्हा (ग्रामीण) चे सहसंयोजक इंजि. राजेंद्र रावते, चंंद्रशेख ढोबळे, राजेश सुर्यवंशी, दर्शन डहाके, पुरुषोत्तम खडसे, राजेंद्र वासनिक, दिनकर चकोले, रामु अवचट, शामलाल लांजेवार तथा इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
Maharashtra News Media सच की आवाज