*पालिकेच्या बागीचाची उद्घाटना आधीच कोसळली संरक्षक भिंत*
*पालिकेच्या बांधकाम विभागावर प्रश्नचिन्ह*
*निकृष्ट बांधकाम झाल्याचा नागरिकांचा आरोप*
*बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी*
*कळमेश्वर विशेष तालुका प्रतिनिधी*
*कळमेश्वर – नगर पालिका अंतर्गत 14वा वित्त आयोगातून कळमेश्वर नगरपालिका कार्यालयासमोर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून उभारण्यात येत असलेल्या गार्डनला नाल्याच्या भिंती शेजारी संरक्षक भिंत म्हणून सिमेंट कॉंक्रीट ची भिंत वीस वर्ष जुन्या दगडाच्या भिंतीवर बांधण्यात आली मात्र अंदाज पत्रक हे जुनी दगडाची भिंत तोडून नवीन भिंत बांधण्याबाबत तयार करण्यात आल्याची चर्चा आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कळमेश्वर नगरपालिका यांच्या कार्यालयासमोर असलेल्या जुन्या मामा तलावाशेजारी बगीच्याचे सौंदर्यीकरण आणि बगिच्याला लागून असलेल्या नाल्यालागत संरक्षक भिंतीचे बांधकाम कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आले या प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी ,तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते वर्षभरापूर्वीच करण्यात आले होते बगीच्याचे काम जवळपास पूर्णत्वास आले असून बगीच्याचे उद्घाटन प्रतिक्षेमध्ये आहे उद्घाटना आधीच काल झालेल्या मुसळधार पावसामुळे ही भिंत कोसळली सोबतच नव्याने बांधकाम करण्यात आलेले शौचालयाचे बांधकाम सुद्धा खचलेले आहे हे बांधकाम 28 लक्ष रुपयांचे असल्याचे प्राथमिक माहिती असून या कामात मोठी अनियमितता झाल्याचे बोलले जात आहे त्यामुळे या भिंतीचे बांधकाम करणारे कंत्राटदार आणि पालिकेचा बांधकाम विभाग यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदरचे बांधकाम वर्षापूर्वीचे असून या बांधकामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे कळमेश्वर पालिकेच्या काही बेजबाबदार पदाधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे शहरांमध्ये निकृष्ट बांधकाम करण्यात येत आहे कमिशन खोरी मुळे कळमेश्वर शहरात होत असलेल्या बांधकाम मध्ये मोठा भ्रष्टाचार होत असून पालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या जवळच्या नातेवाईकांना काम जावे म्हणून पालिकेने काढलेले कंत्राट सेटलमेंट करण्यात येत असून मोठी कमिशन खोरी या कामांमध्ये होत असल्याने गेल्या चार वर्षांमध्ये कळमेश्वर ब्राह्मणी शहरामध्ये पालिकेकडून करण्यात आलेल्या संपूर्ण बांधकामाची चौकशी आणि स्ट्रक्चरल ऑडिट शासनाकडून करण्यात यावे निकृष्ट बांधकाम करण्यासाठी जबाबदार असलेले पालिकेचे अधिकारी,पदाधिकारी यांची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी शहरवासीयांनी कडून होत आहे.*
*शहरांमध्ये मध्ये काल दिनांक 5 ऑगस्ट बुधवारी दुपारीपासूनच पावसाची संततधार सुरू झाली या मुसळधार पावसामध्ये तालुक्यातील छोट्या-मोठ्या नदी-नाल्यांना मोठ्या पुराचे स्वरूप प्राप्त झाले होते. याच पावसामध्ये पालिकेने बांधकाम केलेली बगीच्या ची संरक्षक भिंत निकृष्ट बांधकाम केल्यामुळे मध्यरात्री कोसळली ही भिंत कोसळली नाही तर भिंतीच्या लगत बगीच्यामध्ये नव्याने निर्माण करण्यात आलेले शौचालय सुद्धा तडे जाऊन वाकलेल्या परिस्थितीत आहे शौचालयाचे बांधकाम सुद्धा पूर्णता निकृष्ट झाल्याने ते बांधकाम यापुढे टिकाव धरू शकत नाही दरम्यान या बांधकामाच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कक्षेत असलेल्या गुणवत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना द्यावे अशी मागणी आहे. त्यामुळे या बांधकामावर पालिकेकडून करण्यात आलेला संपूर्ण खर्च वाया गेलेला आहे झालेल्या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून करण्यात आलेल्या निकृष्ट बांधकामाची ची चौकशी करण्याची मागणी स्थानीय नागरिकांकडून करण्यात आली आहे*
*भिंत कोसळल्याची घटना*
*घडूनही नाल्या लगत राहणारे काही नागरिकांनी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सदर भिंत कोसळली बाबतची माहिती देऊनही घटनास्थळावर पालिकेचा कुठलाही पदाधिकारी आणि अधिकारी पोहोचला नसल्याची माहिती स्थानीय नागरिकांनी दिली आज दुसऱ्या दिवशी सकाळी पालिकेचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर भेट देऊन आत्मचिंतन केले की काय अशी चर्चा शहरांमध्ये होती.*
*’संरक्षक’ भिंत का कोसळली?*
*कळमेश्वर पालिकेच्या लगतच जे एस डब्लू कॉलनी च्या पाठीमागून एक नाला आहे हा नाला नगर परिषद माध्यमिक विद्यालयाच्या बाजूंना असलेले स्वीपर कॉलनी लगत गेला असल्यामुळे वीस वर्षांपूर्वी या नाल्याच्या दोन्ही बाजूवर संरक्षक भिंतीचे दगडाचे बांधकाम करण्यात आले आहे त्यानंतर कळमेश्वर पालिकेकडून नाल्या लगत असलेल्या तलावाशेजारी बगीच्याचे बांधकाम करण्यात आले आहे बगीच्याचे बांधकाम करत असताना नाल्या शेजारी वीस वर्ष जुन्या भिंतीवर नव्याने भिंत उभारण्यात आली मात्र ही भिंत उभारताना जुनी भिंत पाडून जमिनीखालून कॉलम उभे करणे गरजेचे होते अंदाज पत्रक मात्र त्याच प्रकारे बनविण्यात आल्याचे माहिती असून जुन्याच बांधकामावर नवीन बांधकाम दाखवून भिंतीच्या लगतच बगीच्या मध्ये माती टाकून लॉन लावण्यात आला संरक्षक भिंतीतून पाणी बाहेर जाण्यासाठी जागोजागी मोठे होल ठेवणं गरजेचे होते, परंतु तसं न केल्यानं भिंतीवर दाब वाढला पाण्याचा दबाव आणि निकृष्ट बांधकाम आणि वजनाची कॅपॅसिटी तपासण्यात न आल्यामुळे सदरचे बांधकाम पडले.*
*संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?*
*निकृष्ट बांधकाम झाल्याचा स्थानिकांचा आरोप*
*पावसाचा जोर आणि पाण्याचा वेग जास्त होता, त्यापुढे कुणीच काही करु शकत नाही, असं म्हणून नेते मंडळी हात झटकताना दिसत आहेत. पण भिंत बांधताना निकृष्ट दर्जाची बांधली, हे पाप कुणाचं…. त्याची जबाबदारी पालिकेला घ्यावीच लागेल.*
Maharashtra News Media सच की आवाज