*आर्वी ते वर्धमनेरी रस्त्याचे कामाला लागले ग्रहण*
*रस्त्याचे पढलेले जीवघेणे गड्ढे भरून काढून लवकरात लवकर या रस्ताचे काम चालू करा अन्यथा आंदोलन करू- भिम टायगर सेना*

वर्धा प्रतिनिधि पंकज रोकड़े
वर्धा– आर्वी ते वर्धमनेरी रस्त्याचे काम गेल्या कित्तेक महिन्या पासून थांबलेले आहे आणि आता पावसाळ्या मध्ये तर हा रस्ता जीवघेणा ठरणार आहे ! यामध्ये रोज कामावर जाणाऱ्या लोकांची अत्यंत वाईट हालत होत आहे, आपातकालीन सेवा हि त्वरित पोहचू शकत नाही, यामध्ये जे रुग्ण अचानक बिमार पडतात, ज्यांना हार्ट अटॅक सारखे जीवघेणा प्रसंग येतो त्यांच्या साठी हा रस्ता “मौत का रस्ता” ठरत आहे.

हे असे प्रकार कमी व्हावे आणि काही गंभीर घटना घडू नये म्हणून….भिम टायगर सेना,आर्वी व समस्त नागरिकांतर्फे कडकडीची विनंती सार्वजनिक बांधकाम विभाग याांना केली आहे.आपण या अति महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष द्यावे आणि या आर्वी ते वर्धमनेरी या रस्त्याचे पढलेले जीवघेणे गड्ढे भरून काढून लवकरात लवकर या रस्ताचे काम चालू करावे.
अन्यथा कोणताही अनुचित प्रकार किंवा जीवित हानी झाली तर याचे सर्वस्वी जबाबदार आपण व आपला विभाग असेल.
आणि प्रशासनाला जनतेचा राग पाहून घावा लागेल !
म्हणून, आम्ही आशा करतो की आपण या विकट समस्याला लवकार निपटारा करा.
या वेळी भिम टायगर सेना चे विनोदभाऊ पायले, सुरजभाऊ मेहरे,
मेघराजजी डोंगरे,अक्षयभाऊ भगत,आशिषभाऊ मोहेंकर,अमोल भाऊ पाटील, धीरज भगत,विलास मनवर,अनिकेत भगत,कैलास पाटील,आदित्य मनवर आदि कार्यकर्ते उपस्तिथ होते….. !
Maharashtra News Media सच की आवाज
