*आज पासून एस टी ची प्रवासी वाहतुक सेवा सुरू!*
कोंढाळी-प्रतिनिधी
एक जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात जाण्या येण्या साठी एस टी ची बस सेवा सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकार ने घेतला आहे।त्या नुसार उद्यापासुन(20ऑगस्ट) पासून एस टी ची प्रवासी वाहतुक सेवा सुरू होणार आहे। या प्रसंगी बस मधून प्रवास करतांना ई पास वा अन्य कोणत्याही प्रकारची परवानगीची गरज असनार नाही, असेही सरकार ने स्पष्ट सुचना दिल्या आहेत। या मुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे।उद्या पासुन एस टी ची साधक, निमाराम, शिवशाही, शिवनेरी, या सर्व प्रकारच्या बस सेवा (मुळ तिकिट दरात) टप्प्या टप्प्या ने सुरू होत आहे, एस टी त प्रवासा दरम्यान ई पास ची आवश्यकता नसून प्रवाशात प्रवाश्यांनी शासनाने घालून दिलेल्या कोव्हिड 19च्या सर्व नियमावली चे काटेकोरपने पालन करने आवश्यक असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे आदेशानुसार ही प्रवासी वाहतुक सेवा सुरू करण्यात आली आहे अशी माहीती उप महा व्यवस्थापक शिवाजीराव जगताप यांनी ही माहिती त्यांना वाचारली असता सांगितले आहे ।
काटोल डेपो मधून सहा प्रवासी मार्ग वर बस सेवा सुरू बाबद माहीती विचारली असता आगार व्यवस्थापक डि एम रंगारी यांनी सांगितले की काटोल आगाराच्या – काटोल ते नागपुर, काटोल-कोंढाळी, काटोल-सावनेर, काटोल-नरखेड, काटोल-सावरगाव, काटोल-लोहारीसावंगा या प्रमाणे बस सेवा सुरू सुरू करण्यात येत आहे प्रवासी संखेत वाढ झाल्यास बस संखेत वाढ करण्यात येणार असल्याचे ही सांगितले आहे ।
Maharashtra News Media सच की आवाज