*सावनेर तालुका कोवीड़19 @ 477*
*टोटल डिसचार्ज 211 तर 259 एँक्टिव्ह व यात 7 रुग्ण दगावले आहेत*
*सावनेर शहर 121*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सावनेर*
*दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असली तरी रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास कोणत्याही प्रकारची उपाययोजना नाही*
*सावनेरः सावनेर तालुक्यातील कोरोना विषाणूंची लागन झालेल्या रुग्णांनी दि.23 आँगस्ट पर्यंत चारशे चा आकडा़ पार करत एकुण 425 रुग्ण असल्याचे व सदर रुग्णांचे वर्गीकरण केले असतख सावनेर नगर पालिका हद्दीत शंभरी पार करत 106 तर खापा नगर पालीका 37 व तालुक्यातील खापा,केळवद,पाटनसावंगी, चिचोली व बडेगाव या प्राथमिक आरोग्य केन्द्रातील गावातून 282 असे एकुण 425 रुग्णांना कोरोना बाधितांची संख्या होती तर त्यात दि.24 आँगस्ट ला 52 रुग्णांची भर पडून तालुक्यातील कोरोना रागन झालेल्या रुग्णांची संख्या 477 झाली असून त्यातील 211रुग्णांनी कोरोना वर मात केली असुन सध्याच्या स्थीतीत तालुक्यात 259 एँक्टिव्ह रुग्ण असुन 7 रुग्ण दगावले ही असल्याची माहिती तहसीलदार दिपक कारंडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दीली*
*तसेच दररोजच्या तपासणी वाढविल्यामुळे तसेच खाजगी डॉक्टरांकडे सर्दी,पडसे,खोकला,ताप या विकासासाठी उपचाराकरिता जाणारे व त्यातूनच हायरिस्क कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण निश्पन्नास येत असुन तपासणीत कोरोनाची लागन निश्पन्न झालेल्यांना लगेच उपचार व विलगीकरण करुण कोवीड़19 विषाणूंच्या संसर्गावर आळा बसविण्याकरिता संपूर्ण प्रशासन सज्ज असुन त्या अनुशंगाने वरच्यावर तश्या सुचना व उपाययोजना तहसीलदार कार्यालयामार्फत निर्गमित केल्या जात आहे.तर या कोवीड़19 च्या रोकथाम करण्यासाठी कार्यरत शासकीय कर्मचाऱ्यांना ही कोरोनाची लागन झाली असली तरी संपूर्ण शासकीय कर्मचारी, तसेच नगरपालिका,आरोग्य विभाग, आशा वर्कर्स आपल्या नैतिक जबाबदारी म्हणून आपले कार्य करत आहेत हे विशेष…*
*कर्मचाऱ्यांना ही कोरोनाची लागन*
*कोरोना विषाणूंची कुणासोबत मैत्री नाही तो कुणालाही होऊ शकतो तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, नगर पालिका कर्मचारी, आशा वर्कर्स आदिंना ही या विषाणूंची लागन झाली असुन सुरक्षिततेचे सर्व उपाययोजना तसेच केन्द्र व राज्य शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन काटेकोर पणे केले जात आहे.दिवसेंनदिवस रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक असल्यासच घरा बाहेर पडावे,गणेशोत्सव हा घरच्या घरीच कमीतकमी लोंकात साजरा करावा व आपल्या घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य व खरी माहीती देण्याचे आव्हान याप्रसंगी केले*

*स्थानिक प्रशासनाने कीतीही विनंतीचे आव्हान केले तरी मात्र रस्त्यावरील गर्दी कमी होण्याऐवजी वाढतच असुन गर्दीच्या ठीकाणी ही नागरिकांशख मास्क व सोशल डिस्टंसींगचा विसर पडल्याचे बघावयास मीळत आहे यावर स्थानिक नगर प्रशासन व पोलीस विभागाच्या वरच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे असे जानकारांचे मत आहे*
*महाराष्ट्र न्युज मीडिया च्या वतीने नागरिकांना निवेदन करण्यात येते की आपण शासनाने कोवीड़19 विषाणूंच्या रोकथाम करिता दीलेल्या दिशानिर्देशाचे पालन करुण स्वतः व स्वतःच्या परिवाराचे तसेच आपल्या परिसरास सुरक्षित ठेवण्यासाठी सहकार्य करावे*
Maharashtra News Media सच की आवाज