*पोलीस बॉईज असोसिएशन अपंग आघाडीच्या वतीने( दिव्यांग, अपंग )लोकांच्या मुद्यावर आमदार राजेश एकडे यानां दिले निवेदन*
कोरपना प्रतिनिधि गौतम धोटे
कोरपना :- परिस्थिती चा बेत लक्षात घेवून माणनिय .रवि भाऊ वैद्य (संस्थापक अध्यक्ष ) विकास सुसर (राज्य सरचिटणीस ) विदर्भ उपाध्यक्ष .गणेश तडसे. यांच्या मार्गदर्शनाखाली , मलकापूर- जि.बुलढाणा कोरोना अनुषंगाने लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांचेच आर्थिक गणिते बिघडली असून दिव्यांग बांधव सुध्दा रोजगार बुडाल्याने चांगलेच अडचणीत आले आहेत. आधीच कोरोनाचा लॉकडाऊन अन् त्यात बुडालेला रोजगार व शासनाच्या वतीने देण्यात येणारे अनुदानही रखडल्याने दिव्यांगांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून याबाबत तात्काळ तोडगा काढून अनुदानाचा प्रश्न मार्गी लावावा तसेच शासनाच्या एखाद्या योजनेमधून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी लोणार (सरोवर) पोलीस बॉईज असोसिएशन मलकापूरच्या वतीने आज २६ ऑगस्ट रोजी आमदार राजेश एकडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, कोरोना पाश्र्वभूमिवर गेल्या पाच महिन्यांपासून सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती आहे. याचा झळा गोरगरीबांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच सोसाव्या लागल्यात. त्यातच अपंग बांधवांना तर या लॉकडाऊन परिस्थितीत अतोनात त्रासास सामोरे जावे लागले. आधिच अपंगत्व व त्यात कामधंदे बंद झाल्याने त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियावर आर्थिक संकटाची कुऱ्हाड कोसळल्याने त्यांचे जगने कठीण झाले आहे. त्यातच शासनाकडून मिळणारे आर्थिक सहाय्य अनुदान सुध्दा गेल्या ३ महिन्यांपासून बँक खात्यात जमा न झाल्याने त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत वेळोवेळी निवेदने देवूनही कुठलाही फायदा झाला नसून अपंग बांधवांच्या समस्या व अडचणींकडे दुर्लक्षच केल्या जात आहे. त्यातच अपंग बांधवांच्या संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या केसेस अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने अनेक लाभार्थी हे या लाभापासून वंचित राहत असल्याने त्या केसेसचा निपटारा तात्काळ होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अपंग बांधवांकरीता ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो. मात्र त्या निधीचे वाटप अद्यापही न.प. प्रशासनाकडून अपंग बांधवांना करण्यात न आल्याने त्या निधीच्या लाभापासून त्यांच्यावर वंचित राहण्याची वेळ आली आहे.
लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाला त्यातच शासनाकडून मिळणारे अनुदानही न मिळाल्यामुळे आजरोजी दिव्यांग बांधवांची कुटुंबे हलाकीचे जीवन जगत असून त्यांच्यासमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. या प्रकरणी संबंधित विभागांना वेळोवेळी निवेदने देवून व प्रत्यक्ष भेटून विचारणा केली असता त्यांच्याकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे देवून अपंगांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. तेव्हा याबाबत आपण लक्ष घालून अपंग बांधवांच्या अनुदानाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा तसेच शासनाच्या एखाद्या योजनेतून अपंग बांधवांना आर्थिक सहाय्य देण्याकरीता प्रयत्न करावे, विविध योजनांची प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावावी व ५ टक्के राखीव निधीचे वितरण तात्काळ करण्याबाबत आपण आपल्या स्तरावर प्रयत्न करावे, अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली. यानंतर महाराष्ट्र भर संघटनेच्या वतीने तहसिलदार , जिल्हाअधिकारी यानां निवेदन देण्यात येणार . *मांगनी मान्य करा अन्यथा अंदोलन* .
निवेदन देतेवेळी पोलीस बॉईज असोसिएशन अंपग आघाडी मलकापुर ,विदर्भ कार्यकरनीचे संघटनेचे धडाडीचे निष्ठावान (नेते ) शेख कलीम, नागेश सुरंगे, निखील पोंदे, मोहनसिंग नवल नांदुरा, शेख वसीम नांदुरा यांच्यासह आदी उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज