Breaking News

*खापरखेडा – कोराडीत 100% टक्के पाणी*

*खापरखेडा – कोराडीत 100% टक्के पाणी*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

नागपुर:- कालपासून पावसाने चांगलाच जोर धरलेला असून शुक्रवार व शनिवार पावसाने चांगलेच विदर्भाला झोडपले आहे त्यामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहे प्रेंच प्रकल्प येथील सोळा दरवाजे उघडल्याने कन्हान व कोलार नदीला पूर आलेला आहे पूर बघण्याकरिता लोकांनी कन्हान व कोल्लार नदीवर पुर बघण्याकरिता एकच गर्दी केली आहे. धरणे शंभर टक्के भरल्याने त्या धरणाचे पाणी सोडण्यात येत आहे आता समाधानकारक पाऊस झाल्याने सर्वांनी खुशी व्यक्त केलेली आहे. समाधानकारक पाणी झाल्याने शेतकरी राजा हा सुखावलेला आहे त्यामुळे आता थोडी उघाड पाहिजे उघाड मिळाल्यास शेतीची उर्वरित कामे आटोपयांची अाहे. शेतक-यांना डवरनी, फावारणी इत्यादी कामे करायची असल्यामुळे आता उघाडाची वाट पाहत आहे बळीराजा. लहान गावाला शासनाने सर्तकेचा ईशारा देण्यात आला. खापरखेडा- कामठी रोडवरती पुलीयांच्या वरून पाणी जात असल्याने माहामार्ग बंद करण्यात आलेला होता.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …