Breaking News

*वैनगंगा नदीच्या पुरामुळे पिकांचे नुकसान*

*वैनगंगा नदीच्या पुरामुळे पिकांचे नुकसान*

सावली प्रतिनिधी – धनराज कोहळे

सावलीजीबगाव-हरांबा मार्गापर्यंत नदीच्या पुराचे पाणी आल्याने आजूबाजूच्या शेतातील खूप मोठे नुकसान झाले आहे. गोसिखुर्द धरणाचे गेट सुरू केल्यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत झालेली वाढ ही शेतकऱ्यांना घातक ठरली आहे. नदीच्या पाण्याची पातळी इतकी वाढली की त्यामुळे आजूबाजूच्या शेतामध्ये भरपूर पाणी साचले आहे. या आलेल्या पुराची माहिती प्रहार सेवक राकेश गोलेपल्लीवार यांनी नायब तहसीलदार यांना दिली व प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान भरपाई देण्याविषयी संवाद साधला. तर सावली चे नायब तहसीलदार कांबळे साहेब हे प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येणार आहोत असे सांगितले. तसेच सावली जाणार मार्ग पुरामुळे पूर्णपणे बंद झालेला आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …