Breaking News

*जिल्ह्यात विकासामध्ये गुणवत्तापूर्वक कामे करून परिवर्तन घडवूया : पालकमंत्री एकनाथ शिंदे*

*जिल्ह्यात विकासामध्ये गुणवत्तापूर्वक कामे करून परिवर्तन घडवूया : पालकमंत्री एकनाथ शिंदे*

गढ़चिरोली प्रतिनिधि-सूरज कुकुडकर

गडचीरोली: जिल्हयातील पुढील 3 वर्षात विकासात्मक परिवर्तन घडवून आणत असताना सर्व कामे गुणवत्तापूर्वक करणे गरजेचे आहे व त्याची संपूर्ण जबाबदारी ही जिल्हा यंत्रणेवर आहे. त्यासाठी सर्वच स्तरावरील प्रशासनाणे आपले योगदान द्यावे आशा सूचना गड़चिरोली चे पालकमंत्री तथा मंत्री नगरविकास श्री. एकनाथ शिंदे यांनी आज आढावा बैठकिमध्ये जिल्हा प्रशासनाला दिला. प्रशासनाने कोविडपासून जिह्याला चांगले सांभाडले आहे आता पूरस्थिती मध्येही आवश्यक मदत वेळेत नागरिकांपर्यंत पोहचवावी असे निर्देशही त्यांनी यावेडी उपस्थिताना दिले. *या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक श्री. शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, उपवनसंरक्षक कुमारस्वामी तसेच संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.*

*पुरस्तिथिचे केले निरीक्षण, घेतला आढावा*

गड़चिरोली जिल्ह्यातील पुरस्थितीबाबत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी सादरीकरण केले. यामध्ये जिल्ह्यातील 12 प्रमुख मार्ग बंद असुन जिल्ह्यातील जवळपास 2100 लोकांना सुरक्षित रेस्क्यू केलेले आहे असे सांगितले.
आज पालमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी हेलीकॉप्टर ने पुरस्तिथिचे निरीक्षण केले.

*भामरागड मधील पूर बाधित घरांच्या व व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी प्रक्रिया राबविणार एकनाथ शिंदे*

जिल्ह्यातील दुर्गम अशा भामरागड तालुक्यांमध्ये गेल्या आठवड्यात पुरामुळे अनेक घरांचे, शेतीचे तसेच भामरागड शहरातील व्यावसायिकांचे नुकसान झाले होते. याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भामरागड या ठिकाणी जाऊन त्याबाबत पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित बाधितांना पुनर्वसनासाठी प्रशासनाकडून प्रक्रिया राबविण्यात येईल असे आवश्वासन दिले. भामरागड तहसील कार्यालयात पुरामुळे बाधित झालेल्या 120 गावांमधील 100 हून अधिक नागरिकांना ब्लॅंकेट व जीवनावश्यक साहित्याचे किट वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी भामरागड तालुक्यातील सर्व 8400 कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य कीट व प्रत्येकाला एकेक ब्लॅंकेट मदत म्हणून दिले. याबाबत उर्वरित साहित्य वाटप येत्या काळात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पालकमंत्री म्हणाले की प्रशासन भामरागड बाबत अतिशय संवेदनशील असून आवश्यक उपाय योजना तातडीने राबवित येणार आहेत. तालुका वासियांच्या पाठिशी पालकमंत्री म्हणून मी सदैव असणार आहे असा दिलासा त्यांनी यावेळी दिला.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …