*स्मार्ट ग्राम बिबी बनले कचरा ग्राम*

*रोडवर घाणीचे साम्राज्य; रोगराई पसरण्याची भिती*
वरोरा प्रतिनिधि मूजम्मिल शेख
वरोरा- बिबी ते राजुरगुडा व नांदाफाटा रस्त्यावर मोठमोठे कचऱ्याचे ढीग साचले असून, यामुळे परिसरातील नागरिक, येणाºया-जाणाºया वाहनांना व त्यातील प्रवाशांना घाणीच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, परिसरातील नागरिकांना त्यामुळे साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. विशेष बाब म्हणजे हे कचºयाचे ढीग स्मार्ट ग्रामपंचायत बिबी चे उपसरपंच यांचा प्रभांग रामनगर मध्ये मुख्य रस्त्यावर मोठमोठे कचºयाचे ढीग साचले दिसत आहे.तर बिबी गावांमधून राजुरगुडा कडे जात असलेल्या रस्त्यावर कचरा आल्याने परिसरातील नागरिकांना व येणाºया-जाणाºया नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तसेच यामुळे गावात रोगराई पसरली असून, अनेक जणांना दवाखान्याच्या चकरा माराव्या लागत आहेत. ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच ग्रामविकास अधिकारी मात्र हे सर्व व्यवस्थापनात संपूर्णपणे अयशस्वी ठरल्याचे दिसत आहे. स्मार्ट ग्रामपंचायत बिबीचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. बिबी गावाला स्वच्छतेच्या बाबतीत मोठमोठे पुरस्कार मिळालेले आहेत, गावाचे नाव घाणीमुळे संपूर्णपणे बदनाम होताना दिसत आहे. रोडवर घरातील ओला व सुका कचरा रस्त्यात पडलेला दिसतो. यामुळे नागरिकांना साथीच्या रोगाचा सामना करावा लागत असून, परिसरात साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावरच परिसरातील नागरिक कचरा टाकतात त्याची दुर्गंधीचा त्रास सर्वांना सहन करावा लागतो.
कचºयाच्या ढिगांमुळे श्वान, आदी जनावरांचा मोठ्या प्रमाणात वावर याठिकाणी वाढल्याने रोगराई वाढते त्यामुळे नको त्या आजाराने नागरिक त्रस्त होऊन दवाखान्याच्या चकरा मारतात. या संपूर्ण परिसराची नागरिकांनी स्वच्छतेची मागणी केली आहे.
Maharashtra News Media सच की आवाज