Breaking News

*पुरग्रस्तांना तात्काळ मदत करा* *6 दिवस लोटून ही पुरग्रस्तांना खावटीची व्यवस्था नाही ही शोकांतिका* *महापुरातील आपादग्रस्तांना सोलापूर-कोल्हापूर महापुराच्या धर्तीवर त्यावेळी दीलेल्या मदतीचे निकष लावण्याची मागणी-चंद्रशेखर बावनकुळे*

*पुरग्रस्तांना तात्काळ मदत करा*

*6 दिवस लोटून ही पुरग्रस्तांना खावटीची व्यवस्था नाही ही शोकांतिका*

*महापुरातील आपादग्रस्तांना सोलापूर-कोल्हापूर महापुराच्या धर्तीवर त्यावेळी दीलेल्या मदतीचे निकष लावण्याची मागणी   –चंद्रशेखर बावनकुळे*

 

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधी सुरज सेलकर व दिनेश चौरसीया*

*सावनेरः काही दिवसांपूर्वी पावसाने थैमान माजवल्या मुळे नद्या नाल्या तुडुंब भरुण वाहू लागले व त्यामुळे कन्हान,जाम,वैनगंगा सारख्या मोठ्या नद्यांनी रौद्र रुप धारण करुण सर्वत्र पाणीच पाणीच अशी अवस्था निर्माण झाली व नदिकाठील गावे व नागरिकांना काही कळण्या अधिच त्यांची घरे अर्धाअधिक नदिच्या पुराच्या पाण्याखाली आली व अतोनात नुकसान झाले याल पुर्णता प्रशासकीय व्यवस्था जबाबदार असल्याचे आरोप भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्य महासचिव व माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यानी लावला असुन जेव्हा मध्यप्रदेश शासनाव्दारे 36 तासा आधीच मध्यप्रदेशात सुरु असलेल्या सतत पावसामुळे नद्यांना पुर येण्याची शक्यता व त्या करीता नागपूर जिल्ह्यातील नदिकाठील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्याच्या सुचना देऊण सुध्दा प्रशासनाने कुणालाही सतर्कतेच्या सुचना दिल्या नाही त्यामुळेच मोठे नुकसान झाले असेही मत व्यक्त केले असुन या पुरात अनेकांची घरे पुराने आपल्या सोबत वाहुन नेले तर अनेक घरे क्षतीग्रस्त झालीत,घरातील तसेच शेतीतील पाळीव जनावरे,कोंबड्या,, बकर्या, गाई,म्हशी,बैल आदिंचा थांग पत्ता नाही,शेतीतील कपाशी,तुर,सोयाबीन, फळभाज्या सह संपूर्ण पीकाची या पुरामुळे अतोनात हानी झाली आहे.पुरग्रस्तांना सहा दिवस लोटून ही खावटीची व्यवस्था मीळाली नाही याला काय म्हणावं,स्थानिक प्रशासनाचे याविषयीचे सर्वेक्षण अद्याप झाले नाहीत यावर राज्य शासनाने येणार्या पंधरा दिवसांत पुरग्रस्तांना त्यांचे झालेल्या नुकसान भरपाई न दिल्यास भारतीय जनता पक्षा तर्फ तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा ही याप्रसंगी देण्यात आला*

*मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना निवेदन*

*माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश सदस्य डॉ राजीव पोतदार, वरिष्ठ भाजप नेते दादाराव मंगळे,रामराव मोवाडे, विजय देशमुख आदिंच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना लेखी निवेदन पाठवीण्यात आले असुन पुरग्रस्तांना अती तातडीने त्याच्या खाण्या-पीण्याची व्यवस्था होण्यासाठी आर्थिक मदत तसेच ज्यांची घरे पुराच्या पाण्यात येऊन क्षतीग्रस्त झाली अथवा वाहून गेली त्यांना अडीच लाख रुपये तर शेतकरी बांधवांना हेक्टरी पन्नास हजार रुपये व पुराच्या पाण्यात वाहून गेलेली अथवा दगावलेल्या जनावरांच्या नुकसान भरपाईची व्यवस्था राज्य शासनाने येत्या पंधरा दिवसात न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ही निवेदनातून देण्यात आला आहे*

*तर याप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हटले की कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यशासन अपयशी ठरले असुन हे राज्य शासन आँनलाईन शासन आहे बंद कमरे व सोशल मीडीया च्या माध्यमातून शासन चालवत आहे असा चिमटा घेत कोरोना कालीन चार महिण्याचे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचे विध्यूत बील माफ करावे तसेच वाढत्या कोरोना प्रादुर्भावावर तातडीने उपाययोजना करावी अशीही मागणी याप्रसंगी करण्यात आली*

*याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये, महामंत्री संजय टेकाडे,वरिष्ठ भाजप नेते किशोर मुसळे,देविदास मदनकर,किशोर तांदुळकर,शहर भाजप अध्यक्ष मंदार मंगळे,नगरसेवक तुषार उमाटे, रविंद्र ठाकूर,अभिषेक गहरवार, सोनू नवधिंगे सह सावनेर शहर व तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …