*शेतकऱ्यासाठी शेर शिवाजी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र*

*सोयाबीन, मोसंबी व कपाशी यांचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत मिळावी*
उपजिल्हा प्रतिनिधी – दुर्गाप्रसाद पांडे
काटोल–नरखेड तालुक्यामध्ये सोयाबीन, मोसंबी व कपाशी हे प्रमुख पीक आहे. याच पिकांवर शेतकऱ्याचं वार्षिक आर्थिक नियोजन अवलंबुन असते.
पण कोरोना सारख्या महामारीने आर्थिक कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्याला खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बोगस बियाण्याचा सामना करावा लागला. त्यानंतर अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. आता सततच्या पावसामुळे व ढगाळ हवामानामुळे सदर पिकावर चक्रभुंगा-खोडमाशी, पाने खाणारी अळी व बुरशीजन्य रोगामुळे सोयाबीनचे १००% नुकसान झाले आहे. मोसंबीची रातोरात गळ होऊन संपूर्ण मोसंबी खाली येत आहे व मर रोगामुळे कपाशीच पीक सुद्धा हातातून जात आहे.
तात्काळ आर्थिक मदत करावी म्हणून उपविभागीय अधिकारी काटोल यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषीमंत्री दादा भुसे, गृहमंत्री तथा स्थानिक आमदार अनिलबाबु देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
खरीप हंगामातील पीक हातातून गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या संकटातून शेतकर्याला तारण्यासाठी शासन आणि प्रशासनातर्फे लवकरात लवकर पंचनामे करून तातडीने RTGS द्वारा शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये भरीव मदत करा. असे निवेदनात नमुद करण्यात आले.

निवेदन देतेवेळी शेर शिवाजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सागर राऊत, अध्यक्ष भूषण पुंड, बबलू उमप, नरखेड तालुकाध्यक्ष स्वप्नील राऊत , काटोल तालुका अध्यक्ष मिथुन उमप, अक्षय धोटे, प्रदीप कुमेरिया, सागर मुन्ने, सत्यम पवार, चेतन कुर्वे, दीपक मोरोलिया, निखिल तरारे, दीपक खजुरीया, उमेश मुरोडीया, आकाश राऊत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

*कांग्रेस कडून ही दिले निवेदन*
काटोल-तालुक्यातील सोयाबीन-संत्रा-मोसंबी-व कपाशी पीकांवर विविध आजारांचे प्रादुर्भावामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या करीता शेतकर्याला शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी काटोल तालुका कांग्रेस अध्यक्ष सतीश पाटील चव्हाण, पं स सदस्य अरूण ऊईके ,कांग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रपाल पाटील, काटोल विधान सभा अध्यक्ष पदम पाटील डेहणकर, प्राध्यापक मोहन ठवळे यांनी निवेदनाचे माध्यमातून मागणी केली आहे.
Maharashtra News Media सच की आवाज