*पाणीप्रश्नासाठी मनविसे चे ‘घागर आंदोलन’*

*बोर्डा गावातील पाण्याची समस्या गंभीर*
वरोरा प्रतिनिधि जुबेर शेख
वरोरा- मागील 4 दिवसापासून बोर्डा गावातील वॉर्ड क्र1 मध्ये पिण्याच्या पाण्याचे नळ बंद आहे.परंतु ग्रामपंचायत सदस्य याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे .
बोर्डा गावात महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण जलस्वराज्य टप्पा 2 अंतर्गत बोर्डा गावातील नागरिकांना फिल्टर पाणी पुरवठा करण्यासाठी नळ बसविण्यात आले .परंतु ही योजना हस्तांतरीत न झाल्याने संबंधित ठेकरदारांने मागील तीन दिवसांपासून नळ बंद केले आहे .त्यामुळे वॉर्ड क्र1 मधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्येला तोंड द्यावे लागत आहे .या भागातील शेतकरी सार्वजनिक बोअर नादुरुस्त असल्यानें नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे .दि.4 सप्टेंबर रोजी प्रभारी सचिव यादवराव चाफले यांची भेट घेऊन समस्या सांगितली असता दि.5सप्टेंबर ला बोअर दुरुस्ती करून देऊ असे आश्वासन दिले परंतु बोअर दुरुस्ती झाली नाही .म्हणून संतप्त महिलांनी मनविसे तालुका उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली ग्राम पंचायत बोर्डा येथे धडक दिली असता कर्मचारी ग्राम पंचायत बंद करून निघून गेले.तसेच सदस्य यांचे म्हणणे आहे की आमचा कार्यकाळ संपला आहे त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही.आंदोलनाचे पुढचे पाऊल गटविकास अधिकारी वरोरा यांची भेट घेऊन समस्या सोडवण्यासाठी विनंती करण्यात येईल .अन्यथा बेमुदत आंदोलन होणारच असे मनविसे तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी यांनी सांगितले आहे.आंदोलनवेळी मनविसे तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी, राहुल जगताप,विकी येरणे, आशिष शिंदे ,सूरज सोयाम,क्रिश धोके वैभव ठाकरे,रोहित पिंपळशेंडे तसेच गावातील महिला उपस्थित होत्या.
Maharashtra News Media सच की आवाज