Breaking News

*बॅरी. शेषराव वानखेडे महाविद्यालयात साक्षरता दिनाचे आयोजन*

*बॅरी. शेषराव वानखेडे महाविद्यालयात साक्षरता दिनाचे आयोजन*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

खापरखेडा:- बॅरी. शेषराव वानखेडे महाविद्यालय खापरखेडा येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने साक्षरता दिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. डाॅ. प्रतिभा गडवे यांनी करताना असे सांगितले की, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुचनेनुसार 8 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगात साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने महाविद्यालयात आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलताना महाविद्यालयाचे अर्थशास्त्र प्राध्यापक डॉ. गजानन सोंमकुवर बोलतांना म्हणाले की या दिवसाच्या साजरीकरणापासुन देशाने साक्षरतेमध्यॆ यश मिळवले आहे. परंतु अजूनही बऱ्याच क्षेत्रात आपणास यश मिळवायचे आहे. जसे विधी साक्षरता, जल साक्षरता, पर्यावरण साक्षरता इ. अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. आर. जी. टाले असे म्हणाले की, या कोविड-१९ च्या काळात शैक्षणिक साक्षरतेसोबत आज या संकटातून बाहेर येण्यासाठी अनेक छोट्या पण महत्वाच्या गोष्टींची साक्षरता आवश्यक आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाईन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रमाणात ऑनलाईन प्रतिसाद मिळाला. तसेच महाविद्यालयातून समस्त प्राध्यापक वृंद व कर्मचारी वर्ग यांनी देखील ऑनलाईन उपस्थिती दर्शविली.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …