Breaking News

*साहित्य क्षेत्रातील उदयोन्मुख हिरा हरपला* *साहित्य क्षेत्रातील अस्तपैलूं व्यक्तिमत्त्व बबनराव वासाडे उर्फ गुरुदास यांचे कोरोनाने दुःखद निधन* *नवोदित लेखक कवी,साहित्य कार, नाटककार बबनराव वासाडे हरपले*

*साहित्य क्षेत्रातील उदयोन्मुख हिरा हरपला*

*साहित्य क्षेत्रातील अस्तपैलूं व्यक्तिमत्त्व बबनराव वासाडे उर्फ गुरुदास यांचे कोरोनाने दुःखद निधन*


*नवोदित लेखक कवी,साहित्य कार, नाटककार बबनराव वासाडे हरपले*

विशेष प्रतिनिधी
कन्हान(टेकाडी)- अल्पावधीतच साहित्य क्षेत्रात आपल्या लेखणीचा ठसा उमटविणारे ,भारतीय सैनिक दलात हवालदार क्लार्क पदावरून निवृत्त झालेले,भारत सरकार गृह मंत्रालय अंतर्गत भारतीय विमान उड्डयन विभाग आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद येथे इंटेलिजन्स ब्युरो मध्ये कर्तव्यदक्ष इमिग्रेशन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री बबनराव भगवानजी वासाडे राहणार टेकाडी (को.ख) ता-पारशिवनी जिल्हा-नागपूर ह.मु.झिंगाबाई टाकली नागपूर यांना 5 दिवसापूर्वी आपल्या कर्तव्यावर असतांना कोरोना संसर्गाची लागण झाली होती,लगेच त्यांना हैदराबाद येथील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले त्यांनी अखेरपर्यंत मृत्यूशी झुंज दिली, डॉक्टरांच्या अथक प्रयत्न नंतर सुद्धा ते वाचू शकले नाहीत व अखेर दि,12/09/2020 ला सायंकाळी 7 वाजता त्यांची प्राणज्योत मावळली व ते आपण सर्वांना सोडून देवाघरी निघून गेले.*

*त्यांचा अल्पसा जीवन परिचय*

*गुरुवर्य श्री बबनभाऊ भगवानजी वासाडे यांचा जन्म टेकाडी (को.ख) ता.पारशिवनी जिल्हा-नागपूर या गावात 15 नोव्हेंबर 1962 ला झाला लहानपनापासूनच घरात आई वडीलाचे संस्कारमय जीवन व आध्यात्मिक विचाराचे बाळकडू त्यांना मिळाले आणि तसेच त्यांचे जीवन घडत राहिले. भाऊ म्हणजे एक दिलखुलास, दिलदार व्यक्तिमत्व नेहमीच धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक,सांगीतिक कार्यक्रमातील निवेदन असो ,की स्वतःचे छंद जोपासणे असो, एक उत्तम चित्रकार,एक उत्कृष्ट लेखक आणि शानदार कलावन्त म्हनुन ते स्वच्छदपणे जीवन जगत राहिले . गरजु लोकाना नेहमिच मदतीचा हात देनारे दानशुर व्यक्तिमत्त्व, जनमानसात लोकप्रिय असलेले बबनराव इतके सारे गुण असूनही अहकारांचा त्यांच्यात किंचित तसूभरही लवलेश नव्हता, बबनराव म्हणजे अंत्यत नम्र,व साधा स्वभावाचा, हळवा मनाचा मनुष्य, गावात आल्यावर लहान अथवा मोठा असो प्रत्येकाची आपुलकीने ,प्रेमाने,विचारपूस करणारा,त्यांच्या कोणत्याही प्रायोजित कार्यासाठी सर्वांशी सल्लामसलत करून निर्णय घेणारा ,बालपणापासून त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांची आवड होती ,आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन छोटी छोटी नाटके बसविणे ,त्यात भूमिका वठविणे आणि कालांतराने याच प्रवाहाने त्यांनी आपल्या सहकारी मित्रांना सोबत घेऊन नवचैतन्य युवा संघ नावाची सांस्कृतिक कार्यक्रम घेणारी, सामाजिक कार्य करणारी संस्था निर्माण केली या रूपाने छोट्या स्या लावलेल्या रोपट्याच रूपांतर वटवृक्षात झाले, त्याच दरम्यान त्यांनि विज्ञान शाखेतून पदवी मिळवली, व देशसेवा करण्याची इच्छा आवड निर्माण झाल्याने घरच्यांचा विरोधाला न जुमानता भारतीय थलसेनेत भरती झाले,त्यादरम्यान त्यांचे शिक्षण सुरूच होते ,एम ए- इतिहास व समाजशास्त्राच्या पदव्युत्तर पदव्या प्राप्त केल्या, त्यानंतर नौकरी करीत असतांना ते स्वस्थ बसले नाहीत प्रमोशन मिळवत हवालदार क्लार्क पदावर पोहचले,सैन्यात 16 वर्ष देशसेवा केल्यानंतर बाउंड संपल्याने सेवानिवृत्ती झाली,त्यानंतर त्यांनी भारत सरकारच्या आदिवासी विभागात चंद्रपूर येथे 3 वर्षे नौकरी केली,17 ऑक्टोबर 2008 पासून भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद येथे इंटेलिजन्स ब्युरो मध्ये इमिग्रेशन अधिकारी म्हणून रुजू झाले,त्यांनी या दरम्यान नौकरी व्यतिरिक्त आपल्या साहित्य क्षेत्रातील छंदाची जोपासना करीत अनेक मराठी हिंदी भाषेत अध्यात्मिक विषयावरील पुस्तके,कवीतेची पुस्तके ,अभंगाची पुस्तके लिहिली,त्यांची आजवर श्रीगुरुपाठ, अभंगावली ही अभंगाची तर गीत रामायण (हिंदी गीतांचा संग्रह), गीत कृष्णायन(मराठी गीतांचा संग्रह), अभंग रामायण(अभंगरूपात रामायण), आणि लेटेस्ट गीत रामायण(मराठी गीतांचा संग्रह) ही अध्यात्मिक भक्तीगीत संग्रह, तर आसवांची ओंजळ (हा मराठी कविता संग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई यांनी प्रसिद्ध केला आहे), आठवणींचे पक्षी(मराठी कविता संग्रह) अशी 8 पुस्तके प्रसिद्ध व प्रकाशित झालेली आहेत, अजूनही काही पुस्तके प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत ज्यामध्ये खरा मृत्यूनंजय ::भीष्म पितामह (मराठी कादंबरी), मर्यादा पुरुषोत्तम:मराठी कादंबरी, गुरुदास श्लोक रामायण , गृहगीता, गुरुदास गीता, अभंगवाणी, यांदो के झरोके से (हिंदी संग्रह), प्रेम केले म्हणून (मराठी तीन अंकी नाटक) इतके ग्रंथ कर्तुत्व त्यांच्या नावे आहे, त्यांनी दोन वर्षांपासून टेकाडी गावात गरिबांना मदत करण्यासाठी “स्व.लक्ष्मीबाई भागवनजी वासाडे” या नावाने एक सामाजिक संस्था स्थापन करून समाजातील गोरगरिबांना स्वताच्या खिशातून पैसे खर्च करून मदत करण्याचे कार्य सुरू केले होते,त्या माध्यमातून त्यांनी गावातील 21 अंत्यत गरीब कुटुंबाची (ज्यांच्या गॅस कनेक्शन नाहीत असे)निवड करून त्यांना स्वखर्चाने गॅस सिलेंडर कनेक्शन सहित घेऊन देण्याचे मोलाचे कार्य केले , असा हा दानशूर,मौलवान, कर्तृत्ववान, माजीसैनिक, लेखक ,कवी,चित्रकार, नाटककार,कादंबरीकार,गझलकार,निवेदक,अभिनेता अष्टपैलू गुण असलेला व्यक्ती आपल्यात नाही हे मन मान्य करीत नाही ,जेव्हा त्यांच्या निधनाची वार्ता कळली मन एकदम सुन्न झाले त्यांचे देहावसान झाले ही गोष्ट मनाला चटका लावून गेली,त्यांना समाजाप्रती आपल्या गावाप्रति अंत्यत तळमळ होती,त्यांची खूप स्वप्ने होती,त्यांना भविष्यात अनेक चांगले व विधायक कार्ये करायची होती पण नियतीला काही औरच मान्य होते,त्यांच्या या निधनाने टेकाडी कन्हान परिसरातील साहित्य सांस्कृतिक क्षेत्रात जगतात जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरून निघणार नाही,*
*ईश्वर त्यांच्या मृतात्म्याला शांती प्रदान करो,त्यांना परमेश्वरपदी चांगले स्थान प्राप्त होवो हीच इश्चरचरणी सदिच्छा व भावपूर्ण श्रद्धांजली नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ सह विभीन्न साहित्य क्षेत्रातुन वाहण्यात येत असुन साहित्यिक परिवाराती एक उदयोन्मुख व्यक्तीमत्व अकळीच हिरावून गेल्याची हळहळ व्यक्त केली जात आहे*

*साहित्य क्षेत्रातील या उदयमान रत्नास महाराष्ट्र न्युज मीडिया परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …