Breaking News

*चंद्रपुर जिल्ह्यात दारू विक्रिस परवानगी द्या अन्यथा ब्लैकमध्ये मिळणारी दारू बंद करा ; मनसेचे सरकार ला निवेदन* *मनसेचे दारू विकून अभिनव आंदोलन करण्याचा इशारा*

*चंद्रपुर जिल्ह्यात दारू विक्रिस परवानगी द्या अन्यथा ब्लैकमध्ये मिळणारी दारू बंद करा ; मनसेचे सरकार ला निवेदन*

*मनसेचे दारू विकून अभिनव आंदोलन करण्याचा इशारा*

वरोरा प्रतिनिधि -जुबेर शेख
चंद्रपूर – जिल्ह्यात गेल्या 5 ते 6 वर्षा पासून सरकारने दारूबंदी केली आहे,तरीही जिल्ह्यात जागोजागी दारू मिळत आहे, याला दारूबंदी म्हणायचे की काय हा प्रश्न जनतेला पडलेला आहे, दारूबंदी असल्यामुळे जिल्ह्यातील व्यापार, उद्योग धंदे,रोजगार,पूर्णपणे ठप्प पडलेला आहे, व दारूबंदी असल्यामुळे ब्लॅकमध्ये दारूचा महापूर पाहायला मिळत आहे, ज्यामुळे सरकारचा महसूल पूर्ण पणे बुडीत झाला आहे, म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शासनाला विनंती केली आहे की एकतर सर्वाना दारू विकण्याची परवानगी देण्यात यावी किंवा ब्लॅक दारू बंद करून जिल्ह्यातील दारू सुरू करावी जेणेकरून चंद्रपूर जिल्ह्याला उद्योगात, व्यापारात,नौकरवर्गाला हाताला काम लागेल,व चंद्रपूर जिल्ह्याला परत चांगले दिवस येतील,असे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वरोरा तालुका इथे दारू विक्री करून अभिनव आंदोलन करेल,असे निवेदन उपविभागीय पोलीस अधीक्षक सन्माननीय निलेश पांडे यांना देण्यात आले.

निवेदन सादर करतांना मनविसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत जुंजारे,तालुका अध्यक्ष गौरव मेले,उपतालुका अध्यक्ष प्रशांत बदकी,आकाश काकडे,कल्पक ढोरे,समीर पाटील सह अन्य उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …