*प्रशासनाच्या दुर्लक्षेमुळे बोरडा गावच्या मुख्य रस्त्याचे बेहाल*
*ग्रामपंचायतीचे देखील दुर्लक्ष*
रामटेक प्रतिनिधी :- पंकज चौधरी
रामटेक– तालुक्यातील बोरडा सराखा या गावातील मुख्य रस्त्याचा एक वेगळाच प्रकार पहायला भेटत आहे.जागोजागी हा रस्ता पूर्णपणे उखडलेला असून मोठमोठे खड्डे पडलेले आहे.नागपूर-जबलपूर महामार्गावर बोरडा सराखा या गावाचा मुख्य रस्ता आहे,या रस्त्याने अनेक विटांचे भट्टे आहेत.वर्षभर सतत विटांचे गच्च भरलेले ट्रक या रस्त्याने आयात-निर्यात होत असतात.अश्या वेळी त्या रस्त्याचे काय हाल होत असेल आपण एक अंदाज लावू शकतो.ग्रामपंचायत या विट भट्ट्यांना NOC देऊन वाहन चालविण्यास आणि विटांचा व्यवसाय करण्यास परवानगी देत असते,पण या सर्व गोष्टीमुळे रस्त्याचे होणारे हाल मात्र ग्रामपंचायतीला दिसत नाही.

दिवसेंदिवस रस्त्याचे हाल बिघडत चाललेलं आहे.रस्त्यावर झाडेझुडपे आणि खराब रस्ता यामुळे विद्यार्थ्यांसाठी येणारी सरकारी बसचे ड्राइवर देखील गावात बस आणण्यास टाळाटाळ करतात.प्रामुख्याने बोन्द्री ते बोरडा रस्ता तयार झाल्याने व मुख्य रस्त्याचे झालेले हाल बघून गावातील सर्व लोकं आणि ग्रामपंचायतीचे सर्व अधिकारी देखील मुख्य रस्ता नाकारून बोन्द्रीच्या रस्त्याने जातांना दिसतात.म्हणून खड्डे पडलेल्या रस्त्याकडे कोणत्याच प्रकारचे लक्ष दिसून येत नाही.यामुळे गावातील लोकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे.याच मार्गाने अनेक लोकांची शेती आहे,शेतामध्ये रासायनिक खत नेण्यास देखील शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.पावसाळ्याचे दिवस सुरू असून त्या खड्ड्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी भरलेलं असते.यामुळे देखील शारीरिक हानी होण्यास काही शंका नाही.आतातरी ग्रामपंचायतने याकडे लक्ष देऊन पडलेल्या खड्ड्याची दुरुस्ती करून जबाबदार ग्रामपंचायत असल्याची जाणीव लोकांना करून द्यावी..
Maharashtra News Media सच की आवाज