Breaking News

*आर्वीमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवकांतील वाद चिघळण्याची शक्यता* *वरिष्ठ नेत्यांच्या प्रयत्नांना अपयश*

*आर्वीमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवकांतील वाद चिघळण्याची शक्यता*

 

*वरिष्ठ नेत्यांच्या प्रयत्नांना अपयश*

वर्धा प्रतिनिधि- पंकज रोकडे

आर्वी : काही दिवसांपासून नगराध्यक्ष व नगरसेवकांमध्ये सुरू असलेला वाद आता चांगलाच चिघळण्याची चिन्हे दिसून येत आहे. अधिकाधिक नगरसेवक अविश्वास आणण्याचे तयारीत असल्याची चुनुक लागताच वरिष्ठ स्तरावरून वाद मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस, संगघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांचेवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु, प्रकरण मिटविण्यात त्यांना अपयश आल्याची विश्वसनीय माहिती आहे.

आर्वी नगरपालिकेत बहुमताने भाजची सरकार आहे. परंतु, काही महिन्यांपासून नगराध्यक्ष व नगरसेवकांना मनमुटाव सुरू आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी दहा नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या खुर्चीला चपलांचा हात घालण्यात आला होता. यानंतर मोठया वादाची ठिणगी पडली. पार्टीने नगराध्यक्ष व नगरसेवकांना नोटीस पाठवुन उत्तर मागविले. असे असूनही वाद थांबण्याचे नाव घेत नाही. नगरसेवकांनी नगराध्यक्षांचे विरोधात मोर्चा उघडला आहे. ऑनलाईन बैठकीवरूनही तणाव निर्माण झाला होता. १९ नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार पालिकेच्या सभागृहात १०० जणांची बसण्याची व्यवस्था असतांना ३० जणांची बैठक का घेतली जावु नये? ऑनलाईन बैठकीत २३ पैकी २० सदस्यांनी भाग घेतला नाही. कोरम अभावी सभा रद्द करावी लागली. आमसभेत महत्वाच्या विषयावर चर्चा होणार होती. यामुळे नाराज २० सदस्यांची चार दिवसांपूर्वी पालिकेत बैठक बोलावली.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …