Breaking News

*हरांबा येथील गावकऱ्यांनी केले लोकवर्गणीतून पाटाची दुरुस्ती*

*हरांबा येथील गावकऱ्यांनी केले लोकवर्गणीतून पाटाची दुरुस्ती*

विशेष प्रतिनिधि
हरांबा- उमरी तलावाकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष
हरांबा उमरी तलाव निर्माण झाला तेव्हा पासून शासनाने आतापर्यंत कोणतीही दुरुस्ती केली नाही. तलावाचा 75% पाणी हा वैनगंगा नदीला वाया जात आहे. मागील 5/6 वर्षा पासून दरवर्षी गावातील काही शेतकरी पुढाकार घेऊन पैसे जमा करून श्रमदान करून पाट दुरुस्तीच काम करत आहे. पाटबंधारे विभागात वारंवार निवेदन देऊन पाट दुरुस्तीच कोणतेही काम आज पर्यंत झालं नाही. आता गावातील काही शेतकरी जीव धोक्यात घालून शेतातील धान वाचवण्यासाठी पाटातील गाळ-कचरा, माती काढण्याच काम रात्रंदिवस करत आहेत. पाट दुरुस्ती साठी गावातील शेतकरी मुखरूजी चिताडे, विनायक चरडुके, हर्षकुमार डोईजड (माजी उपसरपंच), किशन चरडुके, रुमाजी लोनबले, ओमदेव उरकुडे व इतर शेतकरी यांनी पुढाकार घेवून पैसे जमा करून रात्रंदिवस एक करत आहेत.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …